खानापुरात सत्ताधारी शिवसेना-कॉंग्रेसची बाजी; भाजपला भोपळा

खानापूर ग्रामपंचायतीची नगरपालिका म्हणून ही दुसरी निवडणूक झाली.
politics
politicsesakal
Updated on

खानापूर : नगरपंचायतीची (Nagar panchayat Election) पंचवार्षिक निवडणूकीत पुन्हा सत्ताधारी शिवसेना-कॉंग्रेसच्या (Shivsena-BJP) पॅनेलने बाजी मारली. सत्ताधारी शिवसेना-कॉंग्रेसला ९ आणि विरोधी राष्ट्रवादी (NCP) प्रणित जनता आघाडीला सात आणि त्यांचा एक समर्थक अपक्ष निवडून आला. भाजपाने निवडणूक प्रतिष्ठेची करुनही भोपळाही फोडता आला नाही.

खानापूर ग्रामपंचायतीची नगरपालिका म्हणून ही दुसरी निवडणूक झाली. गेल्या वेळेप्रमाणे तिरंगीच झाली. सत्ताधारी कॉंग्रेस-शिवसेना महाआघाडी, विरोधी राष्ट्रवादी पुरस्कृत राजेंद्र माने, सचिन शिंदे, राजाभाऊ शिंदे यांची जनता आघाडी आणि भाजप असा रंगतदार सामना झाला. एकूण १७ जागांपैकी सत्ताधारी शिवसेना-कॉंग्रेसच्या पॅनेलचे नेतृत्व आमदार अनिल बाबर, सुहास शिंदे, पांडुरंग डोंगरे यांनी केले. यावेळी सत्ताधाऱ्यांना ९ जागा म्हणजे काठावरील बहुमत मिळाले आहे.

politics
कडेगावमध्ये सत्तांतर; राज्यमंत्र्यांचा पराभव करत भाजप सत्तेत

राष्ट्रवादी पुरस्कृत जनता आघाडीचे नेतृत्व माजी आमदार सदाशिव पाटील यांनी केले. त्यांच्या आघाडी माने, शिंदे, शिंदे यांनी केले. भाजपनेही निवडणूक लढवली. आमदार गोपिचंद पडळकर यांचे निवडणूकीकडे लक्ष दिले. स्थानिक सुहास पाटील व सुजित कदम यांनी नेतृत्व केले. मात्र त्यांना भोपळाही फोडता आली नाही. खानापूर नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकालाचा परिणाम खानापूर घाटमाथ्यावर होणार आहे. याचा सर्वाधिक परिणाम जुन्या खानापूर जिल्हा परिषद गटावर जाणवणार आहे. कारण येत्या काळात गावोगावच्या सोसायटीच्या निवडणुका आहेत. शिवाय पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायतीच्या निवडणुका‌ही पुढील वर्षात होणार आहेत. त्यामुळे खानापूर नगरपंचायतीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

politics
बाप आठवल्याशिवाय राहणार नाही; आबांचं स्वप्न पूर्ण - रोहित पाटील

निवडणुकीत सत्ताधारी आमदार अनिल बाबर व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुहास नाना शिंदे यांच्या कॉंग्रेस-शिवसेना महाविकास आघाडीने सत्ता कायम राखण्यासाठी प्रयत्न केले. तर विरोधी राजेंद्र माने, सचिन शिंदे, राजाभाऊ शिंदे यांच्या गटाने सत्ता परिवर्तनासाठी ताकद लावली होती. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी खानापूर नगरपंचायतीच्या माध्यमातून तालुक्यातील स्थानिक पातळीवर राजकीय प्रवेशाचा प्रयत्न केला. यामुळे पुढील काळात सर्वत्र तिरंगी लढती होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

six people killed in Maharashtra Karnataka border land dispute vijapur chadchan crime
Crime
Ek Bharat Shreshtha Bharat Program News
Vedika Dake Mumbai Police success story
Marathi News Esakal
www.esakal.com