भाजपची डबल ढोलकी : सचिन वाझे यांना खलनायक ठरवत आहेत विरोधी पक्ष ; नाना पाटोले यांचा हल्लाबोल

Congress state president Nana Patole criticism on bjp sangli marathi news
Congress state president Nana Patole criticism on bjp sangli marathi news
Updated on

सांगली  :  अभिनेता सुशांतसिंह रजपूत याच्या प्रकरणापासून भाजपने महाराष्ट्राला बदनाम करण्याचा कार्यक्रम राबवला आहे. बिहार निवडणूकीत फायदा मिळावा म्हणून भाजपने राज्याला बदनाम केले. आता सचिन वाझे प्रकरणात तेच सुरु आहे. त्यांना खलनायक ठरवण्याचा विरोधी पक्ष करत आहे. भाजप डबल ढोलकी वाजवणारा पक्ष आहे, असा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज येथे केला.


सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या पाटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आमदार तथा जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील आदी उपस्थित होते.
 पटोले म्हणाले, ""विधी मंडळाचे काम संविधानिक केले पाहिजे. राज्यपाल त्याला असंविधानिक करत असतील तर गंभीर स्वरुपाचा प्रश्‍न उभा राहिला आहे. विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त नियुक्‍त्या वेळीच केल्या पाहिजे होत्या. राज्यपाल भवन भाजपचे कार्यालय झाले आहे. राज्यपालांची भूमिका संशयास्पद आहे. राज्यपाल पदाचे आगळे वेगळे महत्व आहे. राज्याचे ते प्रमख आहेत. महाराष्ट्राच्या जनतेचे ते प्रमुख आहेत. अशावेळी पक्षपात करणे, ही योग्य गोष्ट नाही. दिल्लीच्या इशाऱ्यावर राज्यपाल काम करतात, असे चित्र आहे. बारा आमदारांबाबत तेच सुरु आहे.

ते म्हणाले, "महाराष्ट्र आघाडी सरकार आले तेंव्हाच्या घडामोडी पाहिल्या तर सुशांतसिंग राजपूत प्रकरण मोठे उदाहरण ठरेल. ते प्रकरण सीबीआयकडे आहे. आता का अहवाल दिला नाही? तीन महिने लॉकडाऊन काळात महाराष्ट्र बदनाम करून बीजीपीला फायदा घ्यायचा होता. बिहार निवडणुकीसाठी त्यांनी महाराष्ट्राला बदनाम करून सोडले. आता सचिन वाझे यांना खलनायक करण्याचे काम विरोधी पक्षाकडून सुरु आहे. केंद्रीय तपास यंत्रणा तपास करते आहे. त्यांनी काय तपास करायचा करावा. त्यांना आता टेस्ट करायच्या तर करा. उलट्या बोंबा मारु नका. डबल ढोलकी वाजवणे ही भाजपची परंपरा आहे. महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न हे लोक करत आहेत. इथली जनता कधीही माफ करणार नाही.''
 संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com