मोदी सरकारच्या इंधन दरवाढीविरोधात कॉंग्रेसचे धरणे 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

सांगली- देशात नरेंद्र मोदी यांचे सरकार 7 जूनपासून दररोज पेट्रोल व डिझेल दरवाढ करत आहे. ही इंधन दरवाढ मागे घ्यावी या मागणीसाठी जिल्हा कॉंग्रेस समितीच्यावतीने कॉंग्रेसभवनसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत हे आंदोलन केले.

सांगली- देशात नरेंद्र मोदी यांचे सरकार 7 जूनपासून दररोज पेट्रोल व डिझेल दरवाढ करत आहे. ही इंधन दरवाढ मागे घ्यावी या मागणीसाठी जिल्हा कॉंग्रेस समितीच्यावतीने कॉंग्रेसभवनसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत हे आंदोलन केले.

केंद्र सरकार 7 जूनपासून दररोज पेट्रोल व डिझेल दरवाढ करत आहे. एकीकडे देश कोरोनासारख्या गंभीर संकटाचा सामना करत असताना केंद्राने अन्यायी पेट्रोल व डिझेल दरवाढ करून सामान्य जनतेची लूट सुरू केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती प्रचंड कमी असताना मोदी सरकारने त्याचा लाभ जनतेला दिला नाही. कोरोनामुळे अनेकांचा रोजगार गेला आहे. उद्योग- व्यवसाय अद्याप पूर्वपदावर नाही. त्यात इंधन दरवाढ ही सामान्य जनतेवर अन्याय करणारी आहे. रोजच्या दरवाढीतून पेट्रोल 9 रूपये 12 पैसे तर डिझेल 11 रूपयांनी वाढले आहे. सध्या पेट्रोलचा लीटरचा दर 87 रूपये 88 पैसे इतका आहे. काही राज्यात पेट्रोलपेक्षा डिझेल दर जास्त झाला आहे. ही दरवाढ सुरूच राहिली तर पेट्रोल व डिझेल शंभर रूपये होईल. केंद्र सरकारने उत्पादन शुल्क वाढवले आहे. त्यामुळे इंधन दरवाढ करून सुरू असलेली नफेखोरी बंद करून इंधन दरवाढ मागे घ्यावी. मोदी सरकारने सामान्य जनतेस वेठीस धरण्याचा प्रकार थांबवावा यासाठी आज कॉंग्रेसच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. 

शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन झाले. आमदार विक्रम सावंत, श्रीमती जयश्री पाटील, श्रीमती शैलजा पाटील, नामदेवराव मोहिते, बाळासाहेब पाटील, बाळासाहेब गुरव, राजेंद्र शिंदे, आर.आर. पाटील, माणिक भोसले, आर.आर. पाटील, माणिक भोसले, अविराजे शिंदे, आप्पासो शिंदे, महापालिका विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, नगरसेवक मंगेश चव्हाण, संतोष पाटील, फिरोज पठाण, मनोज सरगर, नगरसेविका वहिदा नायकवडी, शुभांगी साळुंखे, मदिना बारूदवाले, अमर निंबाळकर, बिपीन कदम, शेवंता वाघमारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress's stand against Modi government's fuel price hike