esakal | सांगलीकरांना दिलासा...तब्बल हजार जणांनी हरवलं कोरोनाला 
sakal

बोलून बातमी शोधा

Consolation to Sanglikars ... Corona lost by a thousand people

ऑगस्ट हा क्रांतीचा महिना...या महिन्यात स्वातंत्र्य संग्रामाची ठिणगी पडली, देश स्वतंत्रही या महिन्यातच झाला.

सांगलीकरांना दिलासा...तब्बल हजार जणांनी हरवलं कोरोनाला 

sakal_logo
By
अजित झळके

सांगली : ऑगस्ट हा क्रांतीचा महिना...या महिन्यात स्वातंत्र्य संग्रामाची ठिणगी पडली, देश स्वतंत्रही या महिन्यातच झाला. कोरोना साथीच्या जागतिक संकटाशी लढ्यातही ऑगस्ट महिना महत्वाचा असेल. जिल्ह्यात वाढत्या रुग्ण संख्येला या महिन्यात आळा बसेल, वेग कमी होईल, अशी अपेक्षा साऱ्यांना आहे. जुलै महिना जिल्ह्यासाठी तणाव वाढवणारा ठरला, मात्र जाता-जाता या महिन्याने एका विक्रमाची नोंद केली. 30 जुलैला कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या तब्बल एक हजार झाली. हजार लोकांनी कोरोनाला हरवलं. 

जिल्ह्यात एकीकडे कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना भितीचे वातावरण आहे. या स्थितीत काही चांगले घडते आहे की नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. अशावेळी एक हजार रुग्णांनी कोरोनावर मात केल्याचे आशादायक चित्र समोर आले आहे. 20 जुलै रोजी हा आकडा 1033 एवढा होता. तो वाढत जाईल आणि लवकरच कोरोनामुक्त जिल्हा होईल, अशी साऱ्यांना आशा आहे. 

कोरोना झाल्यानंतर मिरजेत उपचार घेणारे मणदूरचे 100 वर्षे वय पार केलेले आजोबा बरे झाले. ते घरी जायला निघाले. व्हील चेअरवर होते. त्यांना निरोप द्यायला रुग्णालयातील सारे कर्मचारी, स्वतः अधिष्ठाता हजर होते. त्यांना गुलाबाचे फुल दिले गेले आण टाळ्या वाजवून त्यांची गावी रवानगी केली. कोरोनाला हरवणारे ते जिल्ह्यातील सर्वात वयस्कर रुग्ण ठरले. एक ते दीड वर्ष वय असणारे सहा ते सात बालके कोरोनाला हरवून नवे आयुष्य जगायला तयार झाली. कोरोनावर अजून औषध सापडलेलं नाही, असं असताना हे घडलं, हे विशेष. त्यात केवळ तरुण होते, असेही नाही. 84 वर्षाच्या आजीनं, जिला कोरोना म्हणजे काय हेही माहिती झालं नाही, तिनं कोरोनावर मात केली. 

मात केली...ते घरी गेले
हे सांगली जिल्ह्यात घडलं ते गेल्या चार महिन्यात. 24 मार्चला पहिला रुग्ण सापडला आणि त्यानंतर पुढच्या काळात कोरोना बाधित रुग्णांची संख्येचा आलेख वाढतच गेला. तो खाली कधी येईल, याची प्रतिक्षा आहेच. मात्र या साऱ्यात एक सुखद बातमी आली. ती म्हणजे, तब्बल एक हजार रुग्णांनी कोरोनाला हरवून टाकलं. त्यावर मात केली आणि ते घरी गेले. जिल्ह्यात दोन हजार 307 रुग्णांना कोरोना झाला. त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. पैकी महापालिका क्षेत्रात 1212 रुग्ण आहे तर ग्रामीण भागात 917, शहरी भागात 178 रुग्णांना बाधा झाली आहे. 
 

संपादन : प्रफुल्ल सुतार