अभियंत्यांचे योगदान सांगली जिल्हा उभारणीत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 डिसेंबर 2019

जिल्ह्याचा उभारणीमध्ये अभियंत्यांचे योगदान दिल्याने विकासातून भर पडली. अनेक अभियंते रात्रीचा दिवस करून काम करतात.

सांगली : जिल्ह्याचा उभारणीमध्ये अभियंत्यांचे योगदान दिल्याने विकासातून भर पडली असल्याचे गौरवोद्‌गार झेडपी अध्यक्ष संग्राम देशमुख यांनी आज येथे पुरस्कार वितरण प्रसंगी काढले. झेडपीतर्फे आदर्श अभियंता पुरस्कारांचे वितरण अध्यक्ष श्री. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आज झाले.त्यावेळी ते बोलत होते. सीईओ अभिजित राऊत, उपाध्यक्ष सुहास बाबर, सभापती अरुण राजमाने, सभापती सुषमा नायकवडी, तमनगौडा रवी-पाटील, सीईओ अभिजित राऊत, अभियंता संघटनेचे माजी अध्यक्ष विजयसिंह महाडिक उपस्थित होते. 

अध्यक्ष देशमुख म्हणाले, देश आणि राज्यात विविध योजना उभारताना अभियंत्यांनी जनतेची आपुलकी, जिव्हाळा निर्माण करून कामे केली आहेत. अनेक अभियंते रात्रीचा दिवस करून काम करताना दिसतात. जलयुक्त शिवार योजनेमध्ये काम केल्यानंतर दुष्काळ निवारण करण्यात यश आले. मात्र त्यानंतर महापुराचा सामना करावा लागला. 

हेही वाचा - महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी हे दोन मंत्री समन्वय ठेवणार
कामात तत्परतामुऴे यश

कालावधीत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सर्व खाते प्रमुखांनी वेळेचे बंधन न पाळता कामे पूर्ण केली. त्यामुळे लोकांना शासनाची मदत मिळाली आहे.'' उपाध्यक्ष बाबर म्हणाले,"" झेडपीच्या अभियंता पुरस्कारांमध्ये सातत्य ठेवावे. त्यात खंड नको. सर्व विभागांनी जनतेशी बांधिलकी राखून काम करावे. विश्वेश्वरय्या यांचे व्हीजन सर्व शांत यामध्ये असावे,'' असेही त्यांनी सांगितले. 

 हेही वाचा - जंक फुडस्‌ खाताय ..? सावधान !

70 टक्के कामांवर फोकस करावा

सीईओ राऊत म्हणाले,"अभियंत्यासह सर्व विभागांनी जनतेशी बांधिलकी राखून 70 टक्के कामांवर फोकस करावा. महापुराच्या कालावधीत बांधकाम, छोटे पाटबंधारे आणि पाणीपुरवठा विभागाने युद्धपातळीवर कामे केली. त्यामुळे लोकांना वेळेत मदत मिळणे सोपे झाले.'' कार्यकारी अभियंता सुरेंद्र मिसाळ यांनी स्वागत केले. सदस्य अरुण बालटे, प्रमोद शेंडगे, सुरेंद्र वाळवेकर, अश्विनी पाटील, रेश्‍मा साळुंखे, कडेगावच्या सभापती मंदाताई कारंडे, कार्यकारी अभियंता दादासाहेब सोनावणे, एस. बी. गायकवाड, एन. पी. कोरे, सुहास कांबळे उपस्थित ह 

पाच लाखांची तरतूद पुरस्कारासाठी

"आदर्श अभियंता पुरस्कारासाठी पाच लाखांची तरतूद करण्यात येईल. नऊ वर्षांनंतर पुन्हा पुरस्कार सुरू करण्यात आले आहेत ते बंद करू नयेत. यासाठी ही भरीव तरतूद केली आहे.'' 
अरुण राजमाने, बांधकाम सभापती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Contribution Of Engineers To District Construction