
किल्लेमच्छिंद्रगड - वाळवा तालुक्याच्या उत्तरेकडील काही गावच्या ग्रामसभा ह्या गेल्या काही वर्षात वादग्रस्त कारणाने गाजलेल्या आहेत. चालू वर्षी जानेवारी महिन्यातील महिना अखेरपर्यंत होणाऱ्या ग्रामसभा शांततेत पार पडाव्यात, सामान्य माणसाच्या आयुष्यातील प्रश्न मार्गी लागावेत. यासाठी तसेच मुद्द्यावरून गुद्द्यावर येणारे प्रसंग टाळण्यासाठी संवेदनशील गावच्या ग्रामसभांना पोलिस संरक्षण मिळावे, ग्रामसभाचे व्हीडीओ चित्रण व्हावे यासाठी प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.