3325 प्रशिक्षणार्थी वायूसैनिकांचा सांबरा येथे पार पडला दिक्षांत समारंभ...

Convocation ceremony of trainee airmen was held at Sambra
Convocation ceremony of trainee airmen was held at Sambra
Updated on

बेळगाव - भारतीय वायूदलाच्या निस्वार्थ सेवा देण्याची परंपरा कायम राखत भारतीय सैन्यदलाच्या सर्व प्रकारच्या युद्धासाठी सैनिकांनी तयार राहावे. आपली सैन्यातील जबाबदारी ओळखून राष्ट्रहितासाठी आणि देशाच्या संरक्षणासाठी सैनिकांनी सज्ज राहावे, असे आवाहन वायूसैनिक प्रशिक्षण केंद्राचे कमांडंट एअर कमोडोर आर. रविशंकर यांनी केले.

सांबरा येथील वायूसैनिक प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 3325 प्रशिक्षणार्थी वायूसैनिकांचा शनिवारी (ता. 20) दिक्षांत समारंभ पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. एअर कमोडो रविशंकर यांनी, कोरोना संसर्गावर देखिल भाष्य केले. त्यांनी कोरोना संसर्गाच्या आधी आणि नंतरची वस्तूस्थिती सैनिकांना समजावून सांगत प्रशिक्षण पूर्ण करून बाहेर पडणाऱ्या सैनिकांनी कोरोना संसर्गासाठी आवश्‍यक सोशल डिस्टंसिंग आणि इतर नियमावलीचे पालन करण्याचे आवाहन केले.

दिक्षांत समारंभात वायूसैनिकांनी आपल्या सैन्यशिस्तीचे प्रदर्शन करताना उत्कृष्ट पथसंचलन केले. यावेळी शारीरीक कसरतींसह मार्शल आर्ट आणि इतर कवायतींचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी सामान्य सेवा प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थी विकाश कुमार, बेस्ट इन अकॅडमीक्‍ससाठी हिमांशु चौधरी, बेस्ट मार्क्‍समेन म्हणून शिवम सिंघल तर, ऑर्डर ऑफ मेरीटमध्ये सवोत्कृष्ठ प्रशिक्षणार्थी म्हणून अंकीत कुमार यांना पदक आणि ट्रॉफि देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी वायू सेनाधिकारी आणि जवान उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com