सांगली - गेल्या सहा वर्षांपासून सांगली पोलिस दलाचा तो भाग होता. २८७ गुन्ह्यांच्या तपासात त्याचा सहभाग होता. आजही तो ऑन ड्युटी होता. अचानक त्याला झटका आला आणि अनपेक्षितपणे त्याचे निधन झाले..‘कुपर’ गेला या बातमीने सारे पोलिस दल हळहळले. त्याच्यावर आज पोलिस मुख्यालयाच्या परिसरात शासकीय इमतमामात अत्यंस्कार झाले. त्यावेळी त्याच्या हस्तक अंमलदार शबाना आतार यांना हुंदका आवरला नाही आणि साऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले.अत्यंत हुशार, चपळ असा कुपर होता. गुन्हे शोध पथकात त्याचा अग्रक्रमाने सहभाग होता. डॉबरमन प्रजातीच्या हा कुपरचा ६ ऑगस्ट २०१९ रोजी त्याचा जन्म झाला होता. गुन्हे शोधक पथकात समावेशानंतर त्याला पुण्यात श्वान प्रशिक्षण केंद्रात १० जानेवारी ते ३० ऑक्टोबर २०२० या कालावधीत प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यानंतर सांगली पोलिस दलात तो दाखल झाला. तेव्हापासून आजपर्यंत तो पोलिस दलाच्या सेवात होता..कूपरच्या सेवाकाळात त्याला ३६४ वेळा गुन्ह्यांच्या ठिकाणी मागणी आली. त्यापैकी ३८७ ठिकाणी प्रत्यक्ष नेण्यात आले. त्याच्या कामगिरीची दखल घेऊन तत्कालीन पालकमंत्री सुरेश खाडे यांना त्याचा सत्कारही केला होता. पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनीही दोनवेळा त्याला गौरविले होते.आज सकाळी कूपरला ह्रदयविकाराचा तीव्र धक्का बसला. उपचारांचा उपयोग न होता त्याची प्राणज्योत मालावली. पोलिस अधीक्षक संदीप घुगे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरिक्षक सतीश शिंदे, कुपरच्या हस्तक शबाना आतार, सुहास भोरे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याला श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर बंदूकीच्या फैरी झाडून पोलिस दलाच्यावतीने अखेरची मानवंदना देण्यात आली. यावेळी कूपरच्या पथकातील कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर झाले होते..कुपरची कारकीर्द...गेल्या सहा वर्षांच्या कालावधीत त्याने तब्बल २८७ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिस दलाला मदत केली होती. १३ गुन्ह्यांचा यशस्वी छडा लावला होता. २०२१ मध्ये जत येथे व २०२२ मध्ये हरीपूर (ता. मिरज) येथे अनोळखी व्यक्तींचे खून झाले होते.पोलिसांच्या हाती कोणतेही महत्वाचे धागेदोरे नसतानाही ‘कुपर’ने आपल्या क्षमतेच्या जोरावर आरोपींचा माग काढला. त्याने केलेल्या मार्गदर्शनानुसारच पोलिस आरोपींनी जेरबंद करु शकले होते. आटपाडी येथील धाडसी घरफोडीच्या गुन्ह्याच्या तपासातही कूपरने महत्वाची भूमिका बजावली होती. त्याने दिशादर्शन केल्याने पोलिसांनी आरोपींना गजाआड केले..त्यांच्याकडून साडेतीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. २०२५ या वर्षातही ५४ गुन्ह्यांच्या तपासात त्याला घटनास्थळी नेण्यात आले होते, त्यापैकी ३८ गुन्ह्यांत त्याचे दिशादर्शन तपासकामी महत्वाचे ठरले. पोलिसांना गुन्ह्याची उकल करता आली.त्याचा लळा अन् जीव कासावीसकुपरच्या हस्तक शबाना आतार या अत्यंत भाऊक झाल्या होत्या. त्या अगदी पिल्लू असताना त्यांनी कुपरला घेतले होते. त्याच्यासोबत दहा महिन्यांचे ट्रेनिंगही त्यांनी घेतले होते. त्यामुळे कुपर आणि शबाना यांचे वेगळेच नाते होते. त्याच्यावर लळा लागला होता..अगदी त्याच्या जेवणापासून सारे काही काळजी त्या घेत होत्या. आज तो अस्वस्थ वाटल्याने शबाना यांचा जीवही कासावीस झाला होता. त्याच्या मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केल्यानंतर त्यांचे अश्रू थांबेनात..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.