धारावीतून आलेल्या बारा वर्षीय मुलीस कोरोना 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

सांगली ः मुंबईतील धारावी झोपडपट्टीतून आलेल्या आणि इस्लामपूर येथे ताब्यात घेऊन अलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेल्या 21 जणांपैकी आणखी एका बारा वर्षीय मुलीस कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. काल 37 वर्षाची एक महिला कोरोना झाला होता. त्यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या आता 31 झाली आहे. साऱ्यांची प्रकृती स्थिर असून मिरजेतील कोरोना रुग्णालयात उपचार सुरू आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली. 

मुंबईतील धारावी झोपडपट्टीतून तब्बल 21 जण दोन दिवसांपूर्वी इस्लामपूर शहर व वाळवा तालुक्‍याच्या हद्दीत चोरीछुपे दाखल झाले होते. दोन महिने झोपडपट्टीत हाल झालेल्या अनेक विकारांनी त्रस्त नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी आपल्या मूळगावी धाव घेतली. विनापरवाना जिल्ह्यात घुसलेल्या या सर्वांना ताब्यात घेऊन अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्यातील एकाने पळ काढला होता. न्यू धारावी, फ्रॅजिक कॅम्प भागातील ते रहिवासी आहेत. विनापरवाना असल्याने त्यांना मुंबईकडे धाडले. काही अंतर मागे जाऊन हे सर्वजण खाली उतरले.

बस त्यांनी परस्पर धारावीला पाठवली. ही मंडळी पायीच पुन्हा कऱ्हाडच्या दिशेने आले. काही काळ विश्रांती घेऊन त्यातील चौघे पुढे इस्लामपुरात आले. हे लोक परत येऊन आपणाला घेऊन जातील, या आशेने बाकीचे मागेच थांबले होते. नंतर त्यांनी शेतातून मार्ग काढत कासेगाव गाठले होते. हे सारे धावारीतून आले असल्याने तणावाची परिस्थिती होती. ती खरी निघाली. त्यातील एक महिलेस कोरोना झाल्याचा अहवाल काल रात्री उशीरा प्राप्त झाला. त्यांच्या संपर्कातील एका बारा वर्षीय मुलीस कोरोनाची लागण झाल्याचे आज सकाळी समोर आले. 

  • एकुण पॉझिटीव्ह रूग्ण- 73 
  • उपचारांतर्गत दाखल रूग्ण- 31 
  • निगेटिव्ह झालेले रूग्ण-40 
  • पॉझिटिव्हपैकी मृत रूग्ण-02  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona, a 12-year-old girl from Dharavi