कोरोना डोस की आरटी-पीसीआर रिपोर्ट; प्रवासीवर्गात संभ्रमावस्था

कोगनोळी कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावर बंदोबस्त कडक
कोरोना डोस की आरटी-पीसीआर रिपोर्ट; प्रवासीवर्गात संभ्रमावस्था
कोरोना डोस की आरटी-पीसीआर रिपोर्ट; प्रवासीवर्गात संभ्रमावस्थाsakal media
Updated on

कोगनोळी : राष्ट्रीय महामार्गावर दूधगंगा नदीवर असणाऱ्या कोगनोळी कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावर महाराष्ट्र व इतर राज्यांतून कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक दोन डोस की आरटी-पीसीआर रिपोर्ट अनिवार्य याबाबत प्रवासीवर्गात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. जिल्हाधिकारी आर. वेंकटेशकुमार यांच्या माहितीनुसार कोरोनाचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना कर्नाटकात प्रवेश दिला जावा, असा आदेश आहे. पण प्रत्यक्षात सीमा तपासणी नाक्यावर 72 तासाच्या आतील आरटी-पीसीआर रिपोर्ट पाहूनच कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे प्रवासीवर्गाचा मोठा गोंधळ उडाला आहे.

कोरोना डोस की आरटी-पीसीआर रिपोर्ट; प्रवासीवर्गात संभ्रमावस्था
'ओमायक्रॉनचा एकही रुग्ण देशात नाही; घाबरु जाऊ नका': राजेश टोपे

कर्नाटक तपासणी नाक्यावर बंदोबस्तास असणारे कर्मचारी आरटी-पीसीआर रिपोर्ट पाहूनच कर्नाटकात प्रवेश देत आहेत. तर जिल्हाधिकारी आर. वेंकटेशकुमार यांच्या माहितीनुसार दोन डोस घेतलेल्या प्रवाशांनाही कर्नाटकात प्रवेश देण्यास मुभा आहे. त्यामुळे महाराष्ट्र व इतर राज्यांतून कर्नाटकात प्रवेश करणाऱयाप्रवासी वर्गात मोठी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

सोमवारी (ता. २९) सकाळी कोगनोळी सीमा तपासणी नाक्याला चिक्कोडीचे पोलिस उपाधीक्षक मनोजकुमार नाईक, निपाणीचे तहसीलदार डॉ. मोहन भस्मे यांनी भेट देऊन या ठिकाणी सुरू असलेल्या कामकाजाची पाहणी केली. यावेळी मनोजकुमार नाईक म्हणाले, कर्नाटकात प्रवेशासाठी आरटी-पीसीआर रिपोर्टची गरज आहे. अन्यथा प्रवाशांना कर्नाटकात प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे या ठिकाणी असणाऱया कर्मचाऱयांसह प्रवासीवर्गात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

कोरोना डोस की आरटी-पीसीआर रिपोर्ट; प्रवासीवर्गात संभ्रमावस्था
शाळेची घंटा वाजणार; काय आहे शिक्षण विभागाची नियमावली?

कर्नाटक शासनाच्या आदेशानुसार याठिकाणी रिपोर्टची तपासणी करुनच कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे. सीमा तपासणी नाक्याला भेटीवेळी निपाणीचे मंडल पोलिस निरीक्षक एस. व्ही. शिवयोगी, निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिल कुंभार, कोगनोळी पोलिस उपठाण्याचे एएसआय एस. ए. टोलगी, एएसआय एस. एम. सूर्यवंशी, राजू गोरखनावर यांच्यासह अन्य कर्मचारी, आरोग्य सेविका आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Eknath Shinde Stays Disqualification Order
Koyna Dam discharge latest update
Koyna Dam released water through its spillway gates for the first time this monsoon after the reservoir level increased due to continuous rainfall.
RBI penalty on Sangli District Central Cooperative Bank
Marathi News Esakal
www.esakal.com