'कोरोना'चा कुस्तीलाही फटका...

 'Corona' effected wrestling...
'Corona' effected wrestling...
Updated on

कोकरुड ः यात्रा म्हटलं की कुस्ती व कुस्ती म्हटलं की यात्रा हे समीकरण ठरलेलं. मात्र यावरती "कोरोना' मुळे गावोगावी होणाऱ्या यात्रा व तेथे होणारी कुस्ती मैदानेही रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे पैलवानांवर संक्रात ओढवली आहे.

सर्वत्र कोरोनाचे सावट असल्यामुळे हाहाकार माजला आहे. सद्य:स्थितीला उपचार उपलब्ध नसल्याने आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. राज्यात शासनाने आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केल्यामुळे उरूस, जत्रा, मेळावे, मोठे लग्न समारंभ व अन्य कार्यक्रम यावर बंदी घालण्यात आली आहे. गर्दी होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश प्रशासनाने दिलेत. 

त्याचा परिणाम यात्रांत होणाऱ्या कुस्ती मैदानांवर झाला आहे. गावोगावी होणारी मैदाने रद्द झाल्यामुळे पैलवान मंडळींवर संक्रात आली आहे. मार्च, एप्रिल, महिन्यात महाराष्ट्रात गावोगावी होणाऱ्या ग्रामदैवतांच्या यात्रेला कुस्ती मैदानाशिवाय रंग चढत नाही. प्रतिवर्षी अनेक यात्रांत कुस्ती मैदान आयोजित केले होते. 

पैलवानांना खुराकाची चिंता 

कोरोनाच्या प्रभावामुळे मैदाने होणार नसल्यामुळे कुस्तींवर आवलंबून असणाऱ्या पैलवानांच्या खुराकाचा प्रश्न गंभीर बनला आहे. जत्रा-यात्रांतील कुस्ती मैदानावर कुस्ती खेळून मिळणाऱ्या बक्षिसांवर पैलवानांचा खुराक व इतर खर्च भागतो. तसेच गावोगावी भरणाऱ्या ग्रामदैवतांच्या यात्रा हे पैलवानांच्या उत्पनाचे सध्याचे तरी एकमेव साधन आहे. त्यावर गडांतर आल्याने गोची झाली आहे. 

प्रसार माध्यमांमुळे जागृती 
"कोरोना' मुळे जग हादरले आहे. साथ रोगांची मालिका भारताच्या ग्रामीण भागात नवीन नसली तरी प्रगत प्रसार माध्यमे वेगाने जागृती करीत आहे. प्लेगसारख्या रोगात शेकडोंचा बळी गेला तसा आत्ता जाऊ नये म्हणून शासनही मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. रोगाचा फैलाव होऊ नये याची काळजी घेतली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्राज्यातील बहुतांश यात्रा-जत्रा रद्द करण्याचे आदेश व कुस्ती मैदाने न भरवण्याच्या सूचना स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आल्या आहेत. या हंगामातील बहुतांश मैदाने रद्द होण्याच्या मार्गावर अथवा स्थगित होण्याच्या स्थितीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sangli Irwin Bridge road damage
Ishwarpur Sangli dowry death case
Murder in Patgaon, Miraj: Dnyaneshwar alias Mauli Patil allegedly killed in a sharp-weapon attack
Forest Officer Team
Marathi News Esakal
www.esakal.com