सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाचा शिरकाव 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 4 August 2020

जिल्हा परिषद, पंचायत समिती पाठोपाठ आज जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाने शिरकाव केला. येथील एका विभागाच्या वरिष्ठ अधिकारी महिलेला कोरोनाची लागण झाली आहे.

सांगली ः जिल्हा परिषद, पंचायत समिती पाठोपाठ आज जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाने शिरकाव केला. येथील एका विभागाच्या वरिष्ठ अधिकारी महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे सारी यंत्रणा हादरून गेली असून त्यांच्या संपर्कात असलेल्यांची चिंता वाढली आहे. 

गेल्या साडेचार महिन्यांपासून कोरोना प्रतिबंधासाठी दिवसरात्र काम करणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयाने कोरोनाला दूर थांबवले होते. या कार्यालयात एकालाही लागण झालेली नव्हती, मात्र गेल्या महिनाभर जिल्ह्यात रुग्णसंख्या प्रचंड वेगाने वाढली आहे. जून महिनाअखेरीस 385 असलेली रुग्णसंख्या साडेतीन हजाराच्या घरात गेली आहे. त्यामुळे कुणाला कोरोना आहे आणि कुणाला नाही, हे तपासणेच आता कठीण आहे. अशा स्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकारी महिलेला कोरोना झाल्याने धक्का बसला आहे. त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona enters in collector office sangli