कोरोनामुळे नर्सिंग कोर्सला वाढली मागणी

बेळगाव शहरात नर्सिंग, बी फार्म सी व डी फार्मसीची अनेक नामांकित महाविद्यालये आहेत.
Nursing
Nursingesakal

बेळगाव : कोरोनामुळे (corona)वैद्यकीय अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा ओढा दिसून येत आहे. शहरात अनेक नर्सिंग, बी फार्मसी व डी फार्मसीची महाविद्यालये आहेत. यंदा या महाविद्यालयात या कोर्सेससाठी मोठ्या प्रमाणात विचारणा झाली. गेल्या दिड महिन्यांपासून महाविद्यालये सुरु झाली असली तरीही अध्यापही या कोर्सेससाठी महाविद्यालयांकडे मागणी होत आहे. कोरोनामुळे या कोर्सेला(nursing course) अच्छे दिन आले आहेत. (Corona increased demandr nursing courses for increasing corona)

बेळगाव शहरात नर्सिंग, बी फार्म सी व डी फार्मसीची अनेक नामांकित महाविद्यालये आहेत. यामध्ये मराठा मंडळ, भरतेश, विजय ऑर्थो, केएलई, बिम्स आदींचा समावेश आहे. बेळगाव शहराला लागून गोवा व महाराष्ट्र असल्याने या भागातील विद्यार्थी देखील या ठिकाणी येतात. कोर्स पुर्ण झाल्यानंतर लगेचच नोकरी मिळत असल्यानेही याकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढलेला दिसत आहे.

शहरातील ही महाविद्यालये सुरु होऊन सुमारे दिड महिना उलटला आहेत. या कार्सला प्रवेश घेण्यासाठी बारावी सायन्स असणे आवश्‍यक आहे. नर्सिंगमध्ये जनरल नर्सिंग ३ वर्षे, बीएसस्सी नर्सिंग ४ वर्षे, एएनएम २ वर्षाचा कोर्स आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना शहरातील खासगी व सरकारी रुग्णालयात नोकरी मिळू शकते. तसेच बारावी सायन्सनंतर बी फार्मसी ४ वर्षे व डी फार्मसी २ वर्षे करता येतो. यानंतर आपल्या स्वतःचे मेडीकल घालण्यासाठी परवाना मिळू शकते. तसेच कोणत्याही मेडीकलमध्ये नोकरी व कोणत्याही गोळ्यांच्या कंपनीत नोकरी मिळू शकते. सध्या याकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. देशभरात कोरोनामुळे २२ मार्च २०२० मध्ये लॉकडाऊन झाले. या काळात डॉक्टर व नर्स यांना मागणी वाढली. तसेच यासंबंधी कोर्सचीही विचारणा झाली. अनेकांनी प्रवेश घेतला असून काही जण अध्यापही विचारणा करताना दिसत आहेत.

कोरोनानंतर नर्सिंगप्रमाणेच बी व डी फार्मसीकडे येण्याचा कल खुप वाढला आहे. कोरोना काळात बंद न पडलेला हा घटक असल्याने याकडे विद्यार्थी आशेने बघत आहेत. डी फार्मसीबद्दल जागृती नसल्याने याचे प्रवेश कमी होत होते. मात्र, आता प्रवेश वाढले आहेत. यंदा महाविद्यालयेही सुरु झाली आहेत.

डॉ. विष्णु कंग्राळकर, प्राचार्य, मराठा मंडळ, डी फार्मसी कॉलेज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com