सांगलीच्या रस्त्यावर चक्क कोरोना

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 एप्रिल 2020

सांगली : टीव्हीवर सतत दिसणारा कोरोना विषाणू आज चक्क सांगलीच्या रस्त्यांवरून चालताना दिसला. भिती नको कोरोनाचा मुखवटा परिधान करीत यापासून होणाऱ्या कोविड- 19 या रोगाविषयी साखराळे (ता.वाळवा) येथील विजय जाधव यांच्या मोहिमेचा हा भाग होता.

सांगली : टीव्हीवर सतत दिसणारा कोरोना विषाणू आज चक्क सांगलीच्या रस्त्यांवरून चालताना दिसला. भिती नको कोरोनाचा मुखवटा परिधान करीत यापासून होणाऱ्या कोविड- 19 या रोगाविषयी साखराळे (ता.वाळवा) येथील विजय जाधव यांच्या मोहिमेचा हा भाग होता.

कोरोनाच्या आपत्तीत विनाकारण फिरून स्वतःबरोबरच इतरांचे जीवनही धोक्‍यात आणणाऱ्या उपटसुंभांना जागे करण्यासाठी त्यांनी ही मोहिम सुरु केली आहे. त्यांच्यासोबत मानवी सांगाड्याचा मुखवटा परिधान केलेले विवेक कदम यांनीही सहभाग घेतला आहे.

 

या दोघांनी आज सांगली शहरातून ही मोहिम सुरु केली. पुढील दहा दिवसातपश्‍चिम महाराष्ट्र तसेच मुंबईपर्यंत जायचा इरादा जाहीर केला. शेतकरी आत्महत्या, शेतकरी कर्जमाफी अशा अनेक प्रश्‍नांबाबत विजय जाधव यांनी कडब्याचा गाडा ओढणे, पदयात्रा अशी अनोखी आंदोलने करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. आता त्यांन कोरोना विषाणूची वेशभुषा परिधान केली आहे.

  
हे वाचा-आमची कोणतीही चाचणी घ्या पण आम्हाला घरी जाऊ द्या ओ... -

त्यांच्यासोबत त्यांचे मित्र विवेक यांनी मानवी सांगाड्याचा मुखवटा परिधान करून त्यांच्या या मोहिमेला साथ केली आहे. नियम पाळा आणि कोरोनापासून स्वतः वाचा इतरांना वाचवा असा संदेश देत त्यांनी आज शहरात ठिकठिकाणी फिरस्ती केली. रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्यांना त्यांनी हटकून त्यांना हातातील फासाची भिती दाखवून सावध व्हायचा सल्ला दिला.
.........


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona on the road to Sangli