Video : अग्गा बाबो, कोरोनासंशयिताचे नातेवाईक घुसले थेट कलेक्टर कचेरीत... अन झालं असं

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 मार्च 2020

नगर ः परदेशात जाणून आलेले किंवा ज्यांच्या हातावर होम क्वॉरंटाईनचा शिक्का मारलेल्यांना प्रशासनाने काही सूचना केल्या आहेत. मात्र, त्याचे पालन केले जात नाही. त्यांच्यामुले समाजाला धोका आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडील एका तालुक्यातील एक व्यक्ती अशी गावभर फिरत होती. त्यामुळे तिला जिल्हा प्रशासनाने जबरदस्तीने उचलले आणि जिल्हा रूग्णालया दाखल केलं.

नगर ः परदेशात जाणून आलेले किंवा ज्यांच्या हातावर होम क्वॉरंटाईनचा शिक्का मारलेल्यांना प्रशासनाने काही सूचना केल्या आहेत. मात्र, त्याचे पालन केले जात नाही. त्यांच्यामुले समाजाला धोका आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडील एका तालुक्यातील एक व्यक्ती अशी गावभर फिरत होती. त्यामुळे तिला जिल्हा प्रशासनाने जबरदस्तीने उचलले आणि जिल्हा रूग्णालया दाखल केलं.

आपल्या घरातील व्यक्तीला प्रशासनाने का उचलले याचा जाब विचारण्यासाठी त्या कोरोना संशयितांचे नातेवाईक थेट जिल्हाधिकारी कार्यालयात घुसले. त्यांनी प्रशासनाने असं का केलं, याचा जाब ते तेथील अधिकाऱ्यांना विचारीत होते. आमच्या मुलाला काय कोरोना झालाय का, त्याला कशाला धरून आणलं, असा वरच्या आवाजात ते जाब विचारीत होते.

तेथील अधिकाऱ्यांनी तुम्ही त्याच्यासोबत रहात होता काय, असा गोडीगुलाबीत सवाल केला. त्यावर ते नातेवाईक भडकले आणि सांगून लागले. आमच्यासोबत तो रहात होता. त्याला कोणताही रोग झालेला नाही, असा त्यांचा हेका सुरूच होता. एकंदरीत हे नातेवाईकही त्याच्या संपर्कात आल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आलं.

त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कानावर ही माहिती घातली. त्या संशयिताच्या हे लोक संपर्कात आलेले आहेत. त्यांनाही होम क्वॉरंडाईन केलं पाहिजे, असे त्यांनी सांगितलं. त्या नातेवाईकांना बोलण्यात गुंतवून जिल्हाधिकारी कार्यालयात रुग्णवाहिका बोलाविण्यात आली. सोबत पोलिसांनाही बोलावून घेतलं.

रूग्णवाहिका आणि पोलीस आल्यावर तर त्यांचा आवाज चढला. आम्हाला काहीच झालेलं नाही. उगाच तुम्ही आमच्या मागं लागू नका, असे ते म्हणत होते. पोलिसांनी तोंडाला रूमाल बांधत त्यांना गाडीत बसण्यास सांगितलं. परंतु ते काही अॅम्ब्युलन्समध्ये बसेनात. मग पोलिसांना आवाज वाढवावा लागला. परंतु तेही भीतीपोटी लांबूनच आपलं कर्तव्य त्याला दरडावत होते. कसेबसे त्यांना गाडीत बसवलं आणि जिल्हा रूग्णालयातील विलगीकरण कक्षात नेलं. तेव्हा कुठं यंत्रणेने मोकळा श्वास घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील स्वीय सहायक सुरेश आघाव यांच्याशी त्या नातेवाईकांनी हुज्जत घातली होती. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. नागरिकांनी त्यास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केलं.

ते नातेवाईक जिल्हा रूग्णालयात दाखल केल्यावर जिल्हाधिकारी कार्यालयातील ते दालन महापालिकेचे पथक बोलावून निर्जंतुकीकरण करण्यात आलं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona suspect's relatives clash at Ahmednagar collector's office