
बेळगाव : कॅण्टोन्मेंट सीईओंना कोरोनाची धास्ती; कक्षासमोरील प्रवेशद्वार बंदच
बेळगाव : सुमारे चार महिन्यांपूर्वी शहरात कोरोना प्रादूर्भाव वाढल्यामुळे कॅण्टोन्मेंट सीईओंनी आपल्या कक्षासमोरील कार्यालयाचे प्रवेशद्वार बंद केले होते. सध्या राज्यातील कोरोनाचे नियम शिथील करण्यात आले आहेत. तरी देखील अध्यापही ते प्रवेशद्वार बंदच आहे. यामुळे सीईओंना अजूनही कोरोनाची धास्ती आहे का? अशी चर्चा कॅण्टोन्मेंट हद्दीत रंगत आहे. सध्या बोर्डाच्या कार्यालयातून मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) के आनंद यांच्या कक्षांमध्ये जाता येणारे प्रवेशद्वार सुरु आहे. मात्र, बाहेरील प्रवेशद्वार बंद आहे.
यामुळे कार्यालयात प्रवेश घेऊन सीईओंना भेटावे लागत आहे. तत्पूर्वी सीईओंना भेटायला आलेल्या रहिवाशांना कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या चौकशीला समोरे जावे लागत आहे. कॅण्टोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयात प्रवेश करण्यासाठी दोन प्रवेशद्वार आहेत. खानापूर रोड व बी. के. मॉडेल शाळेच्या बाजूने येणाऱ्या प्रवेशद्वाराचा समावेश आहे. ती दोन्ही प्रवेशद्वार सुरु आहेत. सीईओंच्या कक्षात जाण्यासाठी बाहेरील बाजूने व आतील बाजूने ये-जा करता येते. यापूर्वी कार्यालयातील कर्मचारी आतून ये-जा करत होते. मात्र, आता सर्वसामान्यांना देखील आतूनच ये-जा करावी लागते. मात्र, अनेक वेळा कार्यालयीन कर्मचारीच त्या नागरीकांची अधिक चौकशी करताना दिसतात.
बेळगाव शहरात तीन महिन्यांपुर्वी कोरोनाची रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत होती. याची खबरदारी म्हणून सीईओंनी आपल्या कार्यालयाचे समोरचे प्रवेशद्वार बंद ठेवले होते. मात्र, सध्या कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली आहे. तसेच नियमही शिथिल करण्यात आले आहेत. यामुळे सीईओंनी देखील आपल्या कक्षाबाहेरील प्रवेशद्वार खुले ठेवावे अशी मागणी हद्दीतल नागरीक करताना दिसत आहेत.यापूर्वी कोरोनामुळे बी. के. मॉडेलच्या बाजुले कँण्टोन्मेंटमध्ये प्रवेश करणारे प्रवेशद्वार बंद होते. सध्या कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्यामुळे ते प्रवेशद्वार खुले करण्यात आले आहे. मात्र, सीईओंच्या कक्षासमोरील प्रवेशद्वार का खुले करण्यात आले नाही. अशी चर्चाही रंगत आहे.
Web Title: Corona Threat Cantonment Ceo Front Entrance Closed Demand To Open Entrance Belgaum
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..