Coronaviras : बेऴगावात जिवंत कोंबडयानांच गाढले खड्यात..

korona viras impact hit the poultry holders belgaum marathi news
korona viras impact hit the poultry holders belgaum marathi news
Updated on

गोकाक (बेऴगाव) : कोरोनाच्या भीतीमुळे दिवसेंदिवस चिकन, मटण खाणाऱ्यांची संख्या घटत आहे, मात्र याचा फटका पोल्ट्री धारकांनाही बसला आहे. कोंबड्यांचे दर कमी झाल्यामुळे पोल्ट्री मालकांकडून जिवंत पक्षीच खड्ड्यात पुरून टाकण्यात येत आहेत. यामुळे पोल्ट्री धारकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

यासंबंधी लोळसूर येथील प्रमुख पोल्ट्रीचालक यमनाप्पा बागाई यांनी सांगितले की, सध्या सोशल मीडियावरील अफवांमुळे कोरोनाची भिती मोठ्या प्रमाणात फैलावत आहे. मात्र यामध्ये कोरोनाचा आणि बॉयलर कोंबड्यांचा कोणताही संबंध नाही. या सर्वांचा परिणाम बॉयलर कोंबड्यांच्या विक्रीवर झाला आहे. गोकाकजवळील लोळसूर येथे सगुणा, व्हीएचएल व विक्री कंपन्यांकडून पिल्ले व आहार आणून ४५ दिवसांनंतर कोंबड्यांना कंपनीकडे पाठवतात.

जिवंत कोंबड्यांचा दर ८ ते १० रुपये

याशिवाय अनेक बेरोजगार बॅंकेंचे कर्ज काढून कोंबड्यांची विक्री करत आहेत. याआधी जिवंत कोंबड्यांना ५५ ते ६५ रुपये प्रतीकिलो भाव मिळत होता तर आता मात्र ८ ते १० रुपये किलोही दर मिळणे अवघड झाले आहे. यामुळे पोल्ट्रीधारक तोट्यात आहेत.

शासनाकडून नुकसानभरपाई मागणी

या कोंबड्यांचे खाद्य सध्या २५ रुपये किलो असून ४५ दिवसात एका कोंबडीला दोन किलो आहार द्यावा लागतो. याशिवाय पोल्ट्री व मजुरीचाही खर्च करावा लागत आहे. चिकनच्या दरात घट झाल्यामुळे लोळसूर भागातील पोल्ट्री चालकांचे १० ते १५ कोटींचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांप्रमाणे पोल्ट्री चालकांनाही शासनाकडून नुकसानभरपाई मिळण्याची मागणी श्री. बागाई यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Satej Patil Supports Farmers in Sangli
Fugitive Interception Slabs: LCB Executes Intelligence Raid Inside Karnataka Border Limits
Jat Police Inspector sp action
Why has monsoon slowed in Sangli?
Marathi News Esakal
www.esakal.com