तासगावच्या भुमिअभिलेख कार्यालयात कोरोनाचा रूग्ण... चिंचणी येथे महिला पॉझिटिव्ह

 रवींद्र माने 
Thursday, 23 July 2020

तासगाव (सांगली) - तासगावच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये असलेल्या भुमिअभिलेख कार्यालयातील एक कर्मचारी कोरोना बाधित झाल्याने खळबळ उडाली आहे. या इमारतीत शहरातील सरकारी कार्यालय आहेत. दरम्यान चिंचणी येथे एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने तालुक्‍यातील कोरोना रुग्णांची संख्या 31 झाली आहे.

तासगाव (सांगली) - तासगावच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये असलेल्या भुमिअभिलेख कार्यालयातील एक कर्मचारी कोरोना बाधित झाल्याने खळबळ उडाली आहे. या इमारतीत शहरातील सरकारी कार्यालय आहेत. दरम्यान चिंचणी येथे एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने तालुक्‍यातील कोरोना रुग्णांची संख्या 31 झाली आहे.

गेल्या काही दिवसापासून तासगाव तालुक्‍यात एकापाठोपाठ एक कोरोना रुग्ण सापडू लागल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. काल चिंचणी येथे एक वृद्ध महिलेला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाल्याने चिंचणी मध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले. तासगाव, शिरगाव, मांजर्डे, पेड, गव्हाण, सावळज ,कचरेवाडी, तुरची पाठोपाठ चिंचणी येथेही वृद्ध महिलेला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान या महिलेच्या संपर्कात आलेल्या तिघांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. कालच तुरची येथे एका युवकाला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते यामुळे तासगाव तालुक्‍यात आतापर्यंत सापडलेल्या कोरोना रुगणांची संख्या 31 झाली आहे. दरम्यान एरंडोली ता मिरज येथे रहाणाऱ्या आणि तासगाव येथे मुख्य प्रशासकीय इमारतीत असलेल्या भुमिअभिलेख कार्यालय यातील एका क्‍लार्कला कोरोना झाल्याचे काल रात्री स्पष्ट झाले. 

तासगावात शुकशूकाट 
जिल्ह्यात पुकारलेल्या आठ दिवसाच्या लॉकडावून ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बहुतांश तासगावात आज शुकशुकाट पसरला होता सर्व रस्ते पूर्णपणे रिकामी होती दुपारनंतर शहरात एकच शांतता पसरली होती ग्रामीण भागात ही जनता कर्फ्यू पाळण्यात येत आहे सावळज मनेराजुरी कवठे एकंद विसापूर बोरगाव यासह अनेक गावांमध्ये जनता कर्फ्यू पाळण्यात येत आहे.
 

संपादन : घनशाम नवाथे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona's patient at Tasgaon's land records office .Women positive at Chinchani