CoronaVirus : नगरमध्ये अडकले 25 परदेशी भाविक

CoronaVirus 25 foreign visitors trapped in the Ahmednagar
CoronaVirus 25 foreign visitors trapped in the Ahmednagar
Updated on

नगर तालुका ः "कोरोना'च्या धास्तीने विमानसेवा बंद असल्यामुळे नगर तालुक्‍यातील अरणगाव येथील मेहेराबादच्या अमरतिथी सोहळ्यासाठी आलेले 25 परदेशी भाविक अडकून पडले आहेत. त्यांत इराणच्या आठ जणांचा समावेश आहे. या सर्व भाविकांची अवतार मेहेरबाबा ट्रस्टच्या वतीने राहण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

दरम्यान, 15 मार्च ते 15 जून या कालावधीत मेहेरबाबा ट्रस्ट दर वर्षी भाविकांसाठी बंद असते. अरणगाव येथे अवतार मेहेरबाबा यांच्या समाधिस्थळी अमरतिथी सोहळ्यास 74 देशांतून भाविक आले होते. काही भाविक अनेक वर्षांपासून कायमस्वरूपी तेथेच राहत आहेत. मात्र, जे परदेशी भाविक एक-दोन महिन्यांसाठी येतात, त्यांतील अनेकांना "व्हिसा' संपल्यामुळे मायदेशी जावे लागते. 
सध्या "कोरोना'च्या धास्तीने अनेक देशांतील विमानसेवा बंद असल्यामुळे 25 परदेशी भाविक अरणगावमध्ये आहेत. त्यांची खासगी ठिकाणी निवासव्यवस्था केली आहे. इराणमधील 17 जणांचा एक गट नुकताच अरणगावला आला होता. त्यांतील नऊ जण परतले. आठजण अद्याप अरणगावमध्येच आहेत. मेहेरबाबा ट्रस्टने त्यांच्या राहण्याची स्वतंत्र व्यवस्था केल्याची माहिती ट्रस्टचे विश्‍वस्त रमेश जंगले यांनी दिली.

मेहेराबाद येथे मेहेरबाबांची समाधी आहे. त्यांनी आयुष्यभर मौन पाळले. त्यांचा भक्त परिवार जगभरात आहे. अगदी व्हॉलीवूडमधील अभिनेते-अभिनेत्री त्यांच्या शिष्य परिवारात येतात. नगर-दौंड रस्त्यावर अरणगाव येथे मेहेराबाद हे ठिकाण आहे. बाबांच्या हयातीपासून तेथे परदेशी भाविकांची वर्दळ आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com