Coronavirus : ब्रेकिंग - गुलबर्गातील तो ठरला कोरोनाचा पहिला बळी...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 11 March 2020

गुलबर्गा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने तालुका आरोग्याधिकाऱ्यांना पाठविलेल्या सुचना पत्रात तसा उल्लेख केला आहे.

बंगळूर : कोरोनाचा पहिला बळी गुलबर्गा येथे ठरला आहे. मुहम्मद हुसैन सिद्दीकी (वय 76) असे त्याचे नाव आहे. 29 फेब्रुवारी रोजी दुबई येथून सिद्दीकी भारतात परतला होता. मात्र भारतात परतल्यानंतर तो आजारी पडला. अखेर त्याचा मृत्यू झाला असून तो कोरोनामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा- रत्नागिरीत यामुळे 8 नवजात कासवांच्या पिल्ल्यांना गमवावा लागला आपला जीव.....

गुलबर्गा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने तालुका आरोग्याधिकाऱ्यांना पाठविलेल्या सुचना पत्रात तसा उल्लेख केला आहे. तसेच अंत्यविधीसाठी खबरदारी घेण्याची सुचना देखिल केली आहे. 

हेही वाचा- Coronaviras : बेऴगावात जिवंत कोंबडयानांच गाढले खड्यात..

 अजूण चार जणांना लागण

कोरोना व्हायरसचा विळखा दिवसेंदिवस भारतासह कर्नाटकात देखिल वाढू लागला आहे. बंगळूर येथे चौघा जणांना त्याची लागण झाल्याचे पुढे आले असतानाच गुलबर्गा येथे कर्नाटकातील कोरोना व्हायरसचा पहिला बळी ठरला आहे. गुलबर्गा जिल्हाधिकाऱ्यांच्या मौखिक आदेशानुसार जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने तालुका अधिकाऱ्यांना याबाबत सुचना केली असून सिद्दीकीच्या अंत्यविधीसाठी पथक नियुक्त करण्याची सुचना तालुका आरोग्य खात्याला केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus death in gulbarga belgaum marathi news