दुबईहून आलेली महिला झाली कोरोना मुक्त; 39 संशयितांच्या अहवालांची अद्याप प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 एप्रिल 2020

साेमवारी दुपारी तीव्र जंतुसंसर्ग असल्याने, तसेच श्‍वसनाला त्रास होत असलेल्या 25 वर्षीय युवकाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रात्री त्याची प्रकृती बिघडली. अत्यवस्थ झाल्याने पहाटे एकच्या सुमारास त्याला तातडीने कृष्णा हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. 
 

सातारा : म्हारुगडेवाडी (ता. कऱ्हाड) येथील 60 वर्षांच्या पुरुषाचा अहवाल मंगळवारी (ता.7) पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या सहा झाली. दररोज एक रुग्ण आढळत असल्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढत असून, नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. साेमवारी (ता. 6) मृत्यू झालेल्या वृद्धाच्या तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तो कोरोनाचा जिल्ह्यातील पहिला रुग्ण ठरला आहे. बाधितांच्या संपर्कात आलेले नवे संशयित कऱ्हाड, जावळी, फलटण, कोरेगाव या तालुक्‍यांतील आहेत. दरम्यान सातारा जिल्ह्यातील पहिली कोरोना बाधित महिला (वय वर्षे 45) रुग्णाचा 14 व्या दिवसाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता आणि आता 15 व्या दिवसाचा रिपोर्टही निगेटिव्ह आला असल्याने त्या आता कोरोना  (कोविड 19) मुक्त झाल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या गेल्या तीन दिवसांपासून एक-एकने वाढत आहे. दोन दिवसांपूर्वी निझरेतील टॅक्‍सीचालक सापडला. त्यानंतर त्याच्या मुलालाही कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. आज म्हारुगडेवाडी येथील वृद्धाला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे कऱ्हाड तालुक्‍यात कोरोनाचे दोन रुग्ण झाले आहेत. संबंधित रुग्ण मुंबईवरून गावी आलेला होता. तो पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आल्यानंतर प्रशासनाने म्हारुगडेवाडी व परिसरातील सर्व्हे सुरू केला आहे. त्याचबरोबर त्याच्या जवळच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना क्वारंटाइन करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. 
कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या सातपैकी सहा जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या निझरेतील बाधिताच्या संपर्कातील नऊ जणांचे अहवालही निगेटिव्ह आले. काल सायंकाळपासून कोरोनासदृश्‍य लक्षणे असलेल्या 22 जणांना विलगीकरण कक्षात दाखल केले आहे. त्यातील जिल्हा रुग्णालयामध्ये 13, कृष्णा हॉस्पिटलमध्ये सात, तर साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दोन जणांना दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, आमच्या परिसरात कोरोनाबाधित रुग्णांचे दहन करण्यात येऊ नये, असे निवेदन संगम माहुली ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. 

 

  •  म्हारुगडेवाडीतील 33 जण विलगीकरण कक्षात 
  •  "कसबा बावडा' कनेक्‍शनमधील गिरवीच्या 103 जणांवर लक्ष 
  •  बनवडीतील आठ व्यक्ती निरीक्षणाखाली 
  •  गिरवी, बनवडी व म्हारुगडेवाडी सील 
  •  पुणे- मुंबईकरांवर लक्ष ठेवण्याची जिल्हाधिकाऱ्यांची सूचना 
  •  नवे संशयित दाखल ः 22 
  •  संशयितांचे अहवाल निगेटिव्ह ः 15 
  •  अहवालांची अद्याप प्रतीक्षा ः 39 
     

Coronavirus : एकेक म्हणता म्हणता आता सहा झाले; त्या मृताचा रिपाेर्टही पॉझिटिव्हच 

जिल्हा रुग्णालयातील रुग्ण कऱ्हाडला 

काल दुपारी तीव्र जंतुसंसर्ग असल्याने, तसेच श्‍वसनाला त्रास होत असलेल्या 25 वर्षीय युवकाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रात्री त्याची प्रकृती बिघडली. अत्यवस्थ झाल्याने पहाटे एकच्या सुमारास त्याला तातडीने कृष्णा हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. 

Coronavirus : दुबईवरुन सातारला आलेल्या महिलेस काेराेनाची लागण

दरम्यान सातारा जिल्ह्यातील पहिली कोरोना बाधित महिला (वय वर्षे 45) रुग्णाचा 14 व्या दिवसाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता आणि आता 15 व्या दिवसाचा रिपोर्टही निगेटिव्ह आला असल्याने त्या आता कोरोना  (कोविड 19) मुक्त झाल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus Infected Woman From Satara District Reports Received Negative