Coronavirus : दुबईवरुन सातारला आलेल्या महिलेस काेराेनाची लागण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 मार्च 2020

कोणीही घाबरून जावू नये, जिल्हा प्रशासन पूर्णपणे दक्ष आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी जिल्हा प्रशासानाला मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे. 
 

सातारा : सातारा जिल्हा रुग्णालयात रविवारी (ता.23) विलगीकरण कक्षात दाखल केलेल्या 45 वर्षीय अनुमानित म्हणून दाखल केलेल्या महिलेचा रिपोर्ट एन.आय.व्ही. पुणे यांच्याकडून प्राप्त झाला आहे. तिला कोविड- 19 बाधित असल्याचे कळविले आहे, अशी माहिती  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.आमोद गडीकर यांनी दिली.
 
या महिलेला उच्च रक्तदाबाचा त्रास 15 वर्षापासून आहे. त्यावर उपचार चालू आहेत. सध्या या महिलेचा रक्तदाब नियंत्रणात आहे. तसेच या महिलेला सध्या विलगीकरण कक्षात ठेवले असून प्राथमिक तपासण्यानंतर या महिलेची प्रकृती स्थित आहे असल्याचेही डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.         

तथापि कोणीही घाबरून जावू नये, जिल्हा प्रशासन पूर्णपणे दक्ष आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी जिल्हा प्रशासानाला मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे. 

Coronavirus : सातारा : कॅलिफोर्नियातील प्रवासी रुग्णालयात दाखल; नागरीकांनी घरीच थांबावे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Women Infected With Covid 19 In Satara