सातारा : 'त्या' काेराेनाबाधिताच्या मुलाचा रिपाेर्टही आला पाॅझिटीव्ह

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 एप्रिल 2020

सातारा जिल्ह्यातील नागरीकांनी घरीच थांबून काेराेनाशी लढणे आवश्यक आहे. विनाकारण रस्त्यांवर येऊन प्रशासनावरील आणि समाजावरील ताण वाढवू नये असे आवाहन सामाजिक संस्थांच्या माध्यमातून देखील करण्यात येत आहे.

सातारा : निझरे (ता. जावळी) येथे मुंबईहून आलेल्या टॅक्‍सीचालकाच्या घशातील स्त्रावाच्या नमुन्याचा अहवाल रविवारी (ता.पाच) पॉझिटिव्ह आला. त्यामुळे प्रशासन हाय अलर्ट झाले. संबंधित गावच्या परिसरात उपाययोजनांची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, आज संबंधित रुग्णाच्या मुलाचा देखील अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. 

रविवारी (ता.पाच) जिल्हा रुग्णालयात चार तर, कऱ्हाडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये सात कोरोनासदृश लक्षणे असलेल्या संशयित रुग्णांना दाखल करण्यात आले. 

निझरे (ता. जावळी) येथील 54 वर्षांच्या व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. त्याला शनिवारी (ता. 4) उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी दुपारी त्याच्या घशातील तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. संबंधित व्यक्ती हा वाळकेश्वर (मुंबई) येथे एकटाच राहात होता. तो गेल्या 14 वर्षांपासून खासगी कारचालक म्हणून काम करत आहे. आठ मार्चला एका टेम्पोने ते गावी आले. त्यांना ताप व सर्दी, खोकल्याचा त्रास होऊ लागला होता. त्यामुळे ते जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी आले होते. कोरोनासदृश लक्षणे असल्यामुळे त्यांना तातडीने विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. रविवारी त्यांच्या तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांना मधुमेहाचा त्रास आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून मार्गदर्शक सूचनांनुसार कोरोना संसर्गाचे उपचार चालू केले आहेत. 

दरम्यान त्या रुग्णाच्या संपर्कातील सर्व निकट सहवासीयांची माहिती घेऊन त्यांची तपासणी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली हाेती. तसेच संबंधित गाव व त्याच्या परिसरातील अन्य गावांचा सर्व्हेही आरोग्य विभागाने सुरू केला हाेता. 

भय इथले संपत नाही; कऱ्हाडकरांना हवी सुरक्षिततेची हमी

Lockdown : अडीच हजार रिक्षाचालक अडचणीत; चालकांसह त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ

Lockdown : निर्यातक्षम द्राक्षे बागांमध्ये पडून; शेतकऱ्यांपुढे अर्थिक संकट

दरम्यान जिल्हा रुग्णालयात सहा कोरोना अनुमानित म्हणून दाखल करण्यात आलेल्यांपैकी एका 22 वर्षी युवक कोरोना (कोव्हीड -19) रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून तो कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.    मरकज काळात  दिल्ली येथे भेट दिलेल्या 5 नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह असून सातारा जिल्ह्यातील दोन नागरिकांना पुरुष 29 व महिला 47 वर्षीय यांना जिल्हा रुग्णालयात तर तीन नागरिकांना वय वर्ष 21 ते 25 दोन पुरुष व एक महिला यांना कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.

रविवारी जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या कोविड-19 रुग्णाचे निकट सहवासीत म्हणून 4 ते 68 वर्ष वयोगटातील 12 नागरिकांना (पुरुष-8 व महिला-4) विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. तसेच 25 ते 85 वयोगटातील तीन नागरिक (दोन पुरुष व एक महिला) श्वसन संस्थेच्या तीव्र  जंतुसंसर्गामुळे अनुमानित म्हणून जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.

कृष्णा मेडिकल कॉलेज येथे 2 ते 54 वर्ष वयोगटातील चार पुरुष नागरिकांना श्वसन संस्थेच्या तीव्र  जंतुसंसर्गामुळे अनुमानित म्हणून दाखल करण्यात आले आहे. वरील सर्व 24 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करुन त्यांच्या घशातील स्त्रावाचा नमुना  आज एन. आय. व्ही. पुणे  येथे  पाठविण्यात आले असल्याचेही डॉ. गडीकर यांनी दिली आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus Patients Son Found Report Positivie n Satara District Hospital