पोटनिवडणूक लढणार की बिनविरोध? काँग्रेस-भाजप निर्णयाकडे लक्ष I Political News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bjp, congress

निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी काँग्रेसचे नेते कोणते पाऊल उचलतात याकडे त्यांचे लक्ष आहे.

पोटनिवडणूक लढणार की बिनविरोध? काँग्रेस-भाजप निर्णयाकडे लक्ष

sakal_logo
By
बलराज पवार

सांगली : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीस जवळपास पावणे दोन वर्षांचा कालावधी बाकी आहे. त्यामध्ये आचारसंहिताचा काळ सोडला तर केवळ दीड वर्षाचा कालावधी राहत असल्याने पोट निवडणूक लढवायची की बिनविरोध करायची याबाबत काँग्रेस आणि भाजप कोणता निर्णय घेणार याकडे लक्ष आहे.

महापालिकेच्या प्रभाग 16 'अ' ची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या प्रभागातून काँग्रेसचे नेते माजी महापौर हारून शिकलगार हे निवडून आले होते. त्यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी निवडणूक आयोगाने पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. पुढील महिन्यात २१ डिसेंबरला मतदान होणार आहे. या रिक्त जागेसाठी हारून शिकलगार यांचे पुत्र काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. मात्र पक्षाने अद्याप याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी काँग्रेसचे नेते कोणते पाऊल उचलतात याकडे त्यांचे लक्ष आहे.

हेही वाचा: सतेज पाटलांनी 14 नगरसेवकांची भेट घेताच जनता दलाच्या भेटीला महाडिक

भाजपने राज्यात दोन निवडणुका बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसला सहकार्य केले आहे. काँग्रेसचे नेते राजीव सातव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी तसेच विधानपरिषदेचे आमदार शरद रणपिसे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी भाजपने काँग्रेस नेत्यांच्या विनंतीला मान देऊन आपले उमेदवार माघार घेत दोन्ही निवडणुका बिनविरोध करण्यासाठी सहकार्य केले आहे. मात्र त्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपचे नेते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करून त्यांना या दोन्ही निवडणुकीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले होते.

एखाद्या सदस्याच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुक बिनविरोध करण्यास भाजपने केलेले सहकार्य लक्षात घेता महापालिकेच्या रिक्त जागेसाठी काँग्रेसचे नेते असे पाऊल उचलणार का? याकडे लक्ष आहे. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे यांनी सध्यातरी महापालिकेची ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे कोणतेही संकेत दिलेले नाहीत. उलट पक्षाच्या निर्देशानुसार निवडणूक लढवण्यात येईल असे स्पष्ट केले आहे. अर्थात भाजप स्वतः निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेणार नाही. मात्र काँग्रेसचे नेते याबाबत कोणती भूमिका घेतात याकडे त्यांचे लक्ष असेल.

हेही वाचा: राजकीय घडामोडींना वेग; काँग्रेस,भाजप, राष्ट्रवादीमध्ये तिरंगी लढतीचे संकेत

loading image
go to top