esakal | पतीच्या मृत्यूचा बसला धक्का अन् सोडले त्या माऊलीने जाग्यावरच प्राण

बोलून बातमी शोधा

पतीच्या मृत्यूचा बसला धक्का अन् सोडले त्या माऊलीने जाग्यावरच प्राण
पतीच्या मृत्यूचा बसला धक्का अन् सोडले त्या माऊलीने जाग्यावरच प्राण
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अंकली (सांगली) : प्रदीर्घ आजाराने पतीचा मृत्यू झाल्याचे समजताच पत्नीचाही हृदयविकाराने मृत्यू झाला. बुवाची सौंदत्ती (ता. रायबाग) येथे बुधवारी (ता. २८) ही घटना घडली. कृष्णाप्पा कोरवी (वय ६०) व कमाबाई कोरवी (वय ५५) असे मयत पती-पत्नीचे नाव आहे. त्यांच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी,

बुवाची सौंदत्ती (ता. रायबाग) येथील कृष्णाप्पा बाळू कोरवी हे गेल्या काही वर्षापासून आजारी होते. बुधवारी प्रदीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांची पत्नी कमाबाई कोरवी यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. कुटुंबातील सदस्यांकडून त्यांना दवाखान्यात हलविण्यात आले. पण डॉक्टरांकडून त्यांना मृत घोषित करण्यात आले. हे ऐकून कोरवी कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. पतीच्या निधनानंतर पत्नीचा ही मृत्यू झाल्याने गावातून हळहळ व्यक्त करण्यात येत होती. कृष्णाप्पा व कमाबाई यांच्या मागे दोन मुलगे, दोन मुली असा परिवार आहे.