
नगर ः चीनसह जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. दिवसागणिक तो बळींवर बळी घेत आहे. आणि लहान मुलं-ज्येष्ठ त्याच्या हल्ल्यात लवकर बळी पडत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने तर या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी आणीबाणी जाहीर केली आहे. हदय पिळवटून टाकणाऱ्या घटना चीनमध्ये घडत आहेत. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतो आहे. तो व्हिडिओ पाहून तुमच्याही हदयात चर्रचर्र होईल.
<
> चीनमध्ये आजपर्यंत कोरोना विषाणूमुळे पाचशेजणांचा बळी घेतला आहे. तब्बल 25 हजार जणांना लागण झाली आहे. त्यामुळे देशोदेशीचे लोक चीनमधून काढता पाय घेत आहेत. भारतानेही आपल्या लोकांना तेथून आणले आहे. नगरमधील तब्बल 28जण चीनमध्ये अडकले होते. त्यांच्या शोध घेऊन आरोग्य विभागाने त्यांची आरोग्य तपासणी केली. त्या सर्वांची प्रकृती ठीक असल्याने आरोग्य विभागाचा जीव भांड्यात पडला आहे.
कोरोना कुठे आईपासून मुलगा हिरावून नेत आहे. तर कुठे प्रेयशी प्रियकराला डोळ्यासमोर सोडून जात आहे. चीनमध्ये असे दुःखाचे डोंगर रोजच तेथील घराघरांत कोसळत आहेत. एका 80 वर्षांच्या आजी-आजोबांच्या व्हिडिओने आपल्याही काळाजात चर्रर्र होईल. वयाची 80 वर्षे एकमेकांची सोबत केलेल्या या दाम्पत्याने मृत्यूवेळीही सोबत केली. मृत्यू समोर त्यांच्या काळजात झालेली उलघाल स्पष्ट जाणवते. ते वृद्ध आजी-आजोबा आयसीआयूमध्ये ऍडमिट आहेत. त्यांची पत्नी पतीच्या हातात हात देते आणि जगाचा निरोप घेते. त्यावेळी विरहाने व्याकूळ झालेले आजोबा चीनी भाषेत काहीतरी बोलतात. ती भाषा आपल्याला समजत नसली त्यांच्या भावना हदयाला भिडतात. पत्नी आपल्याला सोडून गेल्याचे समजताच तेही या जगाचा निरोप घेतात. त्यावेळी पाहणाऱ्याच्या डोळ्यातून टचकन पाणी गळते... दोघांनाही एकमेकांचा हातात हात घेतला.
तो व्हिडिओ तेथील रूग्णालयाच्या कॅमेऱ्यात कैद आहे. टिकटॉक, फेसबुक, ट्विटर, व्हॉटसऍप या सोशल माध्यमातून तो शेअर केला जात आहे. ट्विटरवर जियांग नावाच्या तरूणाने हा व्हिडिओ 3 फेब्रुवारीला शेअर केला आहे. तो तब्बल 15 हजार वेळा रिट्वीट झाला आहे. त्याच्या लाईक्सही 30 हजारांपर्यंत गेल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.