मनमोकळ्या सुसंवादाने फुलला संसार!  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Solapur

लक्षात राहणारा महिला दिन.. 
माझे पती नेहमीच माझ्यासाठी काहीना काही स्पेशल करत असतात. यंदाच्या महिला दिनी त्यांनी मला पूर्णवेळ आराम दिला. मुलांच्या मदतीने त्यांनी घरातील नियोजन पाहिले. अशाच गोष्टीतून आपला संसार अधिक आनंददायी होत असतो, असे विद्या गवंडी यांनी सांगितले. 

मनमोकळ्या सुसंवादाने फुलला संसार! 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मी मूळची पुण्याची. 2001ला पुणे शहर पोलिस दलात भरती झाले. नातेवाइकांनी माझ्यासाठी सोलापूरचं स्थळ आणलं. मुलगाही पोलिस असल्याने कुटुंबीयांनी लग्न ठरवलं. 2003ला लग्नानंतर मी सोलापुरात आले. 2004 ला सोलापूर शहर पोलिस दलात दाखल झाले. माझे वडील सदाशिव केसरे हेही पोलिस दलात होते. आई शकुंतला ही जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका होती. माझे सासरे शिवशरण गवंडी हेही पोलिस दलातून निवृत्त झाले आहेत. पती संतोष हे सन 2000पासून पोलिस दलात कार्यरत आहेत. सध्या त्यांची ड्यूटी गुन्हे शाखेतील श्‍वान पथकात आहे. मुलगी समीक्षा ही दहावीत तर मुलगा शौर्य दुसरीत शिकतोय. 

पोलिसांची धावपळ माहिती असल्याने सर्वांनी मला समजून घेतले. आधी कामाला प्राधान्य दे.. असं पती संतोष यांनी मला सांगितलं आहे. माझ्या प्रत्येक गोष्टीत त्यांनी मला सहकार्य केले आहे. नोकरीच्या ठिकाणी, घरी एखादी नकारार्थी घटना घडली तरी तू टेन्शन घेऊ नको, चांगलं होईल असं म्हणून ते नेहमीच मला सकारात्मक ऊर्जा देत असतात. प्रत्येक अडचण मी त्यांच्यासोबत शेअर करते. त्यातून मार्ग काढण्यासाठी ते मला कायमच मार्गदर्शन करत असतात. 

आनंदी आयुष्यासाठी पती-पत्नीने एकमेकांशी सुसंवाद ठेवायला पाहिजे. चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टी एकमेकांशी शेअर करायला हव्यात. कोणतीही गोष्ट लपवून ठेवू नये. ती कितीही खासगी असली तरी दोघांनी एकमेकांना सांगायला हवी. जेव्हा पती-पत्नी एकमेकांशी खुल्यापणाने संवाद करतात तेव्हाच संसार सुखाचा होतो.. असंच नातं आमच्या दोघातही आहे. 

सासू-सासऱ्यांनीही मला समजून घेतले. माझी नेमणूक सध्या पोलिस आयुक्तालयातील सुरक्षा शाखेत आहे. आजवरच्या कामगिरीबद्दल गेल्याच महिन्यात मला पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह मिळाले. पतीसह साऱ्यांनीच हा आनंद साजरा केला. 

लक्षात राहणारा महिला दिन.. 
माझे पती नेहमीच माझ्यासाठी काहीना काही स्पेशल करत असतात. यंदाच्या महिला दिनी त्यांनी मला पूर्णवेळ आराम दिला. मुलांच्या मदतीने त्यांनी घरातील नियोजन पाहिले. अशाच गोष्टीतून आपला संसार अधिक आनंददायी होत असतो, असे विद्या गवंडी यांनी सांगितले. 

loading image
go to top