मॉर्निंग वॉकचा दंड 72 हजारांवर; न्यायालयाचा दणका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 एप्रिल 2020

लोकांनी समाजाच्या राहिले स्वतःच्या सुरक्षेसाठी तरी घरी रहावे. थोडे दिवस घरात राहिल्यास काहीही फरक पडणार नाही. पोलिस संबंधितांना वारंवार आवाहन करत आहेत. तरीही काही लोक विनाकारण फिरताना, मॉर्निंग वॉकला जाताना दिसत आहेत. हे बरोबर नाही. प्रशासनाला सर्वांनी सहकार्य करावे. लॉकडाऊन संपेपर्यंत शहर व परिसरात पोलिसांकडुन अशा कारवाया सुरुच राहतील, असा इशारा शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी दिला आहे.

कऱ्हाड ः कोरोनामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला जमावबंदी आदेश डावलून अनेक लोक मॉर्निंग वॉकलाही बाहेर पडत आहेत. त्यांच्या विरोधात साेमवारी शहर पोलिसांनी कारवाई केली. त्याअंतर्गत शहर व परिसरातील तब्बल 76 जणांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यातील 72 जण मंगळवारी (ता.7) न्यायालयात हजर राहिले. त्यांना प्रत्येक एक हजाराचा दंड न्यायालयाने ठोठावला.
 
कोरोनाच्या संकटातून सावरण्यासाठी लॉकडाऊन जारी झाल्यानंतरही पहाटे मॉर्निंग वॉकला जाणे अनेकांनी सुरूच ठेवले आहे. कालच त्यासंदर्भात छत्रपती शिवाजी स्टेडियम परिसर, शहरातील मुख्य रस्ता, विद्यानगर, ओगलेवाडी, मलकापूर, आगाशिवनगर, बनवडी, कार्वेनाका परिसरात पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, सहायक पोलिस निरीक्षक विजय गोडसे, राहुल वरोटे, अमित बाबर, पोलिस उपनिरीक्षक शिवराम खाडे, सहायक फौजदार राजेंद्र पुजारी, प्रदीप कदम, दीपक साळुंखे, हवालदार खलील इनामदार, आप्पासाहेब ओंबासे, मारुती लाटणे, प्रफुल्ल गाडे व सहकाऱ्यांनी संबंधिताविरोधात धडक कारवाई करून 76 जणांना ताब्यात घेतले. त्यामुळे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यातील 72 जण उपस्थित झाल्यावर न्यायालयाने त्यांना 72 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. त्यामुळे संबंधितांना मॉर्निंग वॉक चांगलेच महागात पडले आहे. 

कारवाई यापुढेही सुरुच राहणार

लोकांनी समाजाच्या राहिले स्वतःच्या सुरक्षेसाठी तरी घरी रहावे. थोडे दिवस घरात राहिल्यास काहीही फरक पडणार नाही. पोलिस संबंधितांना वारंवार आवाहन करत आहेत. तरीही काही लोक विनाकारण फिरताना, मॉर्निंग वॉकला जाताना दिसत आहेत. हे बरोबर नाही. प्रशासनाला सर्वांनी सहकार्य करावे. लॉकडाऊन संपेपर्यंत शहर व परिसरात पोलिसांकडुन अशा कारवाया सुरुच राहतील, असा इशारा शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी दिला आहे.

लाकडे जमविण्यापासून ते सरण रचण्यापर्यंत प्रशासनाला कसरत करावी लागली. अंत्यसंस्कार गाडीसाठीही बराच वेळ खोळंबा झाला. सविस्तर वाचा या लढ्याविषयी 

दुबईहून आलेली महिला झाली कोरोना मुक्त; 39 संशयितांच्या अहवालांची अद्याप प्रतीक्षा

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Court Ordered Thousand Rupees Fine To Morning Walkers