सांगलीत दोन कुटुंबातील दहा जणांना कोरोनाची लागण

विजय लोहार
Monday, 11 January 2021

एकावर रुग्णाला कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

नेर्ले (सांगली) :  तांबवे ता. वाळवा येथील दहा जणांचा कोरोना  अहवाल पॉजीटिव्ह आल्याचे कासेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ राजेंद्र भिसे यांनी सांगितले. वाळवा तालुक्यातील महामार्ग पासून पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या तांबवे गावात तब्बल दहा जणांचा कोरोना अहवाल पॉजिटीव्ह आल्याने  तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे त्यामुळे कासेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे.

वाळवा तालुक्यातील एकाच गावातील दहा कोरोना बाधित रुग्ण सापडले त्यामुळे भीतीचे वातावरण आहे. काल शनिवारी  एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तांबवे येथील दोन कुटुंबातील दहा जणांना बाधा झाली. त्या कुटुंबातील व्यक्तींना गेल्या चार पाच दिवसापासून त्रास होत होता. मात्र त्यांनी अंगावर काढले.त्यानंतर त्यांची अँटिजन घेण्यात आली या दहाही जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे कासेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेंद्र भिसे यांनी सांगितले.

हेही वाचा- कल कोल्हापूर महापालिकेचा : शहराच्या सर्वांगीण विकासाचा आदर्श रोडमॅप तयार -

यातील एकावर रुग्णाला कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तर राहिलेल्या कोरोणा बाधित लोकांना होम आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले आहे.परिसरातील आरोग्य कर्मचारी व  आशा स्वयंसेवीका व कर्मचारी यांच्या माध्यमातून सर्व्हे सुरू झाला आहे.ग्रामस्थांनी घाबरू नये. नेहमीप्रमाणे मास्कचा वापर करावा.सर्वानी मास्क वापरल्याशिवाय बाहेर पडु नये.सामाजिक अंतराचे नियम पाळावेत.गरज असल्याशिवाय बाहेर पडू नये. तसेच ताप, सर्दी,खोकला जाणवल्यास प्राथमिक आरोग्य केंद्रास तात्काळ भेट द्यावी.

संपादन- अर्चना बनगे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: covid 19 positive ten people in sangli