लस शासनाची अन् गाजावाजा नेत्यांचा! अपुऱ्या सेवेमुळे नागरिक त्रस्त

Vaccination
Vaccinationesakal
Updated on
Summary

शासकीय केंद्रावर लस नसल्याने सामान्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

निपाणी : लस शासनाची, मनुष्यबळ आणि यंत्रणाही शासनाचीच, परंतु निपाणी शहर (nipani city) आणि ग्रामीण भागात लसीकरण शिबिरांचे आयोजन करून नागरिकांना फुकटात लस देत असल्याचा गाजावाजा करीत काही नेते, कार्यकर्ते फुकटात समाजसेवा करत असल्याचे दिसत आहे. (covid -19 vaccination) मात्र शासकीय केंद्रावर लस नसल्याने सामान्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

निपाणी तालुक्यात सध्या लशीचा तुटवडा आहे. मागील आठवडाभरात केवळ 12 हजार डोस प्राप्त झाले आहेत. तर दुसऱ्या बाजूला लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या अत्यल्प असल्याने विश्वास वाढून नागरिक लस घेण्यासाठी उत्साहाने पुढे येत असल्याचे दिसते. परंतु लस नसल्याने त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. जे डोस येतात, त्यावरही राजकीय नेते डल्ला मारत असल्याचे चित्र शहर, ग्रामीण भागात दिसत आहे. विविध कारणे सांगून आपापल्या प्रभागात लसीकरण शिबिर आयोजित करीत आहेत. यासाठी सर्व यंत्रणा शासकीय वापरत असून काहीजण समाजसेवेचा गाजावाजा करीत आहेत.

Vaccination
बेळगावात महापालिकेवर भगवा फडकवा; खासदार संजय राऊतांचं आवाहन

कोरोना लस मोफत आहे. ती शासकीय केंद्रावरही उपलब्ध आहे. राजकीय अथवा तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांकडून शिबिरे आयोजित करून लसीकरण केले जात आहे. मोफत लस दिली जात असल्याचे सांगितले जात असून सोशल मीडियावरही गाजावाजा केला जात आहे. त्यामुळे शिबिरांवर थोडे नियंत्रण ठेवून प्रभागानुसार शासकीय केंद्रावरूनच लसीकरण करावे. त्यामुळे सर्वांना समान लस मिळेल, अशी मागणी होत आहे.

दुसऱ्या डोसची प्रतीक्षा

शहर, ग्रामीण भागात अचानक शिबिरे घेतले जात असल्याने पहिला डोस दिला जातो. त्यामुळे दुसरा डोसची तारीख असतानाही लाभार्थ्यांना ती वेळेवर मिळत नसल्याचे सांगितले जात आहे. आतापर्यंत निपाणी, चिक्कोडी तालुक्यात 1 लाख 12 हजार नागरिकांनी पहिला डोस घेतला असून त्यापैकी दोन्ही डोस पूर्ण झालेल्यांची संख्या केवळ 70 हजार आहे.

Vaccination
रणधुमाळी; बेळगावात राष्ट्रीय पक्षांचे समितीसमोर आव्हान

"लशीचा तुटवडा आहे, हे खरे आहे. आलेले डोस तालुक्यातील शहर आणि ग्रामीण भागात वितरित केले जातात. संबंधित केंद्रातून माहिती घेऊन लसीकरण केले जात आहे."

- डॉ. व्ही. व्ही. शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी, चिक्कोडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Latest Koyna Dam storage report
MD Drugs Replace Gang Rivalries: Organized Crime Network Tightens Grip in Western Maharashtra
Anjali Vetal from Karad wins bronze medal at U-15 Asian Wrestling Championship in Thailand
Wildlife rescuer trapped by rat snake
Marathi News Esakal
www.esakal.com