आयसोलेशन करण्यात आलेल्या लक्षणे नसलेल्या रुग्णांवर उपचार होणार जलद

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 2 September 2020

सांगली आयएमए तर्फे कोविड केअर सेंटर सुरू होणार

सांगली : सांगलीत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे. शहरातील हॉटेल न्यू प्राईडच्या इमारतीमध्ये हे सेंटर असणार आहे. गुरुवार  3 पासून हे सेंटर सुरू होणार आहे.

महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस आणि सांगली आय एम ए चे पदाधिकारी यांच्यात झालेल्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महानगरपालिकेच्या डेडिकेटेड कोवीड हेल्थ सेंटर व कोरोना केअर सेंटरला दिलेल्या भेटीनंतर सांगली शहरातील हाॅटेल प्राईड येथे कोविड केअर सेंटर सुरू करीत आहे.

महापालिका आयुक्त नितीन कापडणीस म्हणाले, आय एम एच्या वतीने कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे.  आय एम एच ए चे डॉक्टर येथे आयसोलेशन करण्यात आलेल्या लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांवर उपचार करतील.

हेही वाचा- या गावात दगड वापरायला बंदी आहे ! गावात दगडी बांधकाम केलेले घर औषधालाही नाही सापडणार

आयएमएचे सचिव डॉ. श्रीनिकेतन काळे म्हणाले, आय एम ए च्या वतीने आम्ही हॉटेल न्यू प्राईस येथे कोविड केअर सेंटर सुरू करत आहोत. कोव्हिड पॉझिटिव असलेल्या पण लक्षणे नसलेल्या आणि आयसोलेशनची गरज असलेल्या रुग्णांना येथे ठेवण्यात येईल त्यांना आय एम एचे डॉक्टर मॉनिटरिंग करतील. तसेच येथे नर्सिंग स्टाफ असेल. दोन दिवसात हे केअर सेंटर सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid Care Center will be started by Sangli IMA