निपाणी :`ई-बाईक्स`ची क्रेझ वाढती! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

electric bike
निपाणी :`ई-बाईक्स`ची क्रेझ वाढती!

निपाणी :`ई-बाईक्स`ची क्रेझ वाढती!

निपाणी : पर्यावरणाचा -हास टाळण्यासाठी ई-वाहनांसाठी शासनाने धोरण तयार केले आहे. या संकल्पनेला प्रतिसाद मिळून `ई-बाईक्स`ची क्रेझ वाढती आहे. चिक्कोडी आणि निपाणी तालुक्यात मागील ३ वर्षांत २ हजारांहून अधिक इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांची खरेदी झाली आहे. त्यामुळे पुढील काही वर्षात सार्वजनिक व खासगी वाहतूक व्यवस्थेत इलेक्ट्रिक वाहनांचे युग अवतरणार आहे.(era of electric vehicles in public and private transportation)

हेही वाचा: कोल्हापूर : ‘ॲट्रॉसिटी’तील पीडितांना तत्काळ पेन्शन

वर्षभरापासून पेट्रोल, डिझेलसह इंधनाचे दर प्रचंड वाढले आहेत. सद्यःस्थितीत नागरिकांना एक लिटर पेट्रोलसाठी १०१ रुपये तर डिझेलसाठी ९२ रुपये मोजावे लागत आहेत. दरवाढीचा सर्वसामान्यांना मोठा फटका बसत असल्याने पेट्रोल व डिझेलवर चालणाऱ्या वाहनांना पर्याय म्हणून ई-वाहनांकडे पाहिले जाऊ लागले आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी नागरिक आता इलेक्ट्रिक वाहनांना पसंती देत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.

इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणाऱ्या नागरिकांना परिवहन विभागाकडून देखील विविध सवलती देण्यात येत असून नोंदणी शुल्क आकारले जात नाही. इलेक्ट्रिक दुचाकीच्या किंमती ६० हजारांपासून तीन लाखांपर्यंत आहेत. याचबरोबर मागील काही वर्षात ई -वाहनांमध्ये नवीन अद्ययावत तंत्रज्ञान विकसित झाल्याने त्यांच्या बॅटरीचीही क्षमता वाढलेली आहे.(Prices for electric bikes range from Rs 60,000 to Rs 3 lakh)

हेही वाचा: पुणे : सिंहगडावर रस्ता चुकलेल्या पर्यटकांना स्थानिकांनी शोधले

निपाणी आणि चिक्कोडी तालुक्यात इलेक्ट्रिक वाहने खरेदीकडे नागरिकांची पसंती वाढली आहे. या वाहनांचा वापर वाढून प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने खरेदीच्या करात सूट दिली जाते. -

-जी. पी. विशाल, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, चिक्कोडी

'आपण गेल्या तीन वर्षांपासून इलेक्ट्रिक दुचाकी विक्रीचा व्यवसाय करीत आहोत. यामध्ये पाच-सहा तास बॅटरी चार्ज केल्यानंतर सुमारे १३० किलोमीटर दुचाकी जाते. तसेच या वाहनाला देखभालीचा कोणताही खर्च नाही. प्रदूषणमुक्त वातावरणासाठी इलेक्ट्रिक वाहन उपयुक्त ठरत आहे.

-अवि सांगावकर,ई-बाईक विक्रेते, निपाणी

ई-वाहनांची वैशिष्ट्ये

  • देखभालीचा खर्च कमी

  • प्रदूषणमुक्त वातावरण

  • चार्जिगनंतर सुमारे १०० किलो मीटर अंतराचा पल्ला

  • वाहन खरेदीच्या करात सूट

Web Title: Craze For E Bikes Growing

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Paschim maharashtra