esakal | बोरगाव मारामारी प्रकरणी 39 जणांवर गुन्हे 

बोलून बातमी शोधा

Crime against 39 persons in Borgaon fight case}

बोरगाव (ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली ) येथील उपसरपंच निवडीवेळी गुरुवारी (ता. 4) झालेल्या तुफान हाणामारी प्रकरणी गावातील 36 जण व मणेराजुरी (ता. तासगाव) येथील 3 अशा एकूण 39 जणांविरोधात आज (ता. 5) गुन्हा दाखल करण्यात आला.

बोरगाव मारामारी प्रकरणी 39 जणांवर गुन्हे 
sakal_logo
By
शम्मु मुल्ला

शिरढोण ः बोरगाव (ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली ) येथील उपसरपंच निवडीवेळी गुरुवारी (ता. 4) झालेल्या तुफान हाणामारी प्रकरणी गावातील 36 जण व मणेराजुरी (ता. तासगाव) येथील 3 अशा एकूण 39 जणांविरोधात आज (ता. 5) गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यापैकी ग्रामपंचायत सदस्य सुजित पाटील, माजी सरपंच नितीन पाटील, माजी उपसरपंच नामदेव पाटील, नंदकुमार पाटील यांच्यासह सात जणांना अटक केली आहे असून, त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. गुन्हा दाखल असलेल्यांमध्ये भाजपचे कवठेमहांकाळ तालुकाध्यक्ष जनार्दन एकनाथ पाटील, बोरगावचे माजी सरपंच नितीन पाटील, महिन्यापूर्वी राजीनामा दिलेले माजी उपसरपंच नामदेव पोपट पाटील, सदस्य सुजित वसंत पाटील यांचा समावेश आहे. 

दरम्यान, आज दुसऱ्या दिवशीही गावात प्रचंड तणाव होता. जादाची पोलिस कुमक मागवण्यात आली असून, जमावबंदी लागू झाली आहे. कालच्या धुमश्‍चक्रीतील मृत ग्रमपंचायत सदस्य पांडुरंग जनार्दन काळे यांचे भाऊ अंकुश यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यात बंदी आदेशाचे उल्लंघन करून उपसरपंच निवडणुकीच्या कारणावरून लोखंडी रॉड, हॉकी स्टिकसह काठ्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मारहाणीनंतर पांडुरंग काळे यांचा उपचारास नेत असताना मृत्यू झाला. गणपती नामदेव पाटील, अण्णा वसंत माने, वसंत विष्णू पाटील, श्रीकांत भाऊसाहेब पाटील यांना गंभीर जखमी होईपर्यंत मारहाण केली आहे. 

सर्व संशयित आरोपींची नावे अशी ः जनार्दन एकनाथ पाटील, नितीन मधुकर पाटील, नामदेव पोपट पाटील, सुजित वसंत पाटील, अनिल ज्ञानदेव शिंदे, संतोष शंकर पाटील, रोहित पोपट शिंदे, राहुल पोपट शिंदे, प्रदीप तानाजी शिंदे, प्रवीण जनार्दन पाटील, अमोल दिलीप पाटील, युवराज आनंदराव पाटील, प्रकाश वसंत पाटील, आप्पासो वसंत पाटील, सचिन वसंत पाटील, अभिनव जनार्दन पाटील, विकास जनार्दन पाटील, नंदकुमार मधुकर पाटील, प्रतीक नितीन पाटील, तुकाराम उत्तम पाटील, किसन हंबिरा शिंदे, बटू ऊर्फ लक्ष्मण आनंदराव शिंदे, अविनाश मधुकर यमगर, जोतिराम राजाराम पवार, महेश दत्तात्रय पाटील, अमित पोपट पाटील, रमेश संभाजी जाधव, जितेंद्र बाळासो पाटील, विनायक भास्कर पाटील, स्मिता नितीन पाटील, अलका दिलीप पाटील, पोपट शिवाजी पाटील, अलका वसंत पाटील, रोहिणी संतोष पाटील, दशरथ एकनाथ पाटील, प्रशांत नंदकुमार पाटील (सर्व रा. बोरगाव) योगेश प्रकाश पवार, अविनाश संभाजी पवार आणि संभाजी तुकाराम पवार (सर्व रा. मणेराजुरी). याशिवाय अन्य 20 ते 25 अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल झाला आहे. 

संपादन : युवराज यादव