esakal | युवतीच्या छेडछाडीवरून दोघांवर हल्ला; बेळगावातील घटना

बोलून बातमी शोधा

crime case in bengal people disputes and one person

या प्रकरणांत दहा ते बारा अज्ञात तरुणांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

युवतीच्या छेडछाडीवरून दोघांवर हल्ला; बेळगावातील घटना
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : युवतीला मेसेज पाठविण्यासह तिची छेड काढण्यावरून तुफान हाणामारी झाल्याची घटना रविवारी (७) हुतात्मा चौकात घडली. यात दोघे जण जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणांत दहा ते बारा अज्ञात तरुणांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तर सोहेल पाशा दड्डीमुल्ला (रा. गांधीनगर) व खुरखान यरगट्टी (रा. शिवाजीनगर) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत खडेबाजार पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, हुतात्मा चौकाजवळ जखमी मुल्ला आणि त्यांचा मित्र यरगट्टी रविवारी कामानिमित्त आले होते. त्याचवेळी त्यांना दहा ते बारा संशयित आरोपींनी गाठून मुलीची छेडछाड करण्यासह मेसेज पाठविण्याबाबत जाब विचारला. त्यावरुन उभयंतात शाब्दीक चकमकीसह अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. याचवेळी अज्ञात दहा ते बारा जणांनी मुल्ला व यरगट्टी यांना मारहाण करण्यास सुरवात केली. त्यापैकी काहींनी लोखंडी सळी, काठ्यासह दगडाने हल्ला केला.

हेही वाचा - Video : बेळगावात पाणी पुरवठा मंडळाची मुख्य पाईपलाईन फुटली; लाखो लीटर पाणी रस्त्यावर -

जखमी दोघांनी मदतीसाठी आरडाओरड करण्याचा प्रयत्न केल्यामुळे लोकांची गर्दी झाली. यापैकी काहींनी मध्यस्थी करून भांडण मिटविण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी हल्लेखोरांनी तेथून काढता पाय घेतला. मारामारीच्या घटनेमुळे हुतात्मा चौकात काहीकाळ तणाव निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणाखाली आणली. त्यानंतर जखमींना वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले. रविवारी रात्री उशिरा यरगट्टी याचा जबाब नोंदविण्यात आला. त्या आधारे अज्ञात दहा ते बारा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.