esakal | निपाणी - महापुरात स्थलांतरावेळी शेतकऱ्याचा बळी, अथणीतील घटना
sakal

बोलून बातमी शोधा

निपाणी - महापुरात स्थलांतरावेळी शेतकऱ्याचा बळी, अथणीतील घटना

निपाणी - महापुरात स्थलांतरावेळी शेतकऱ्याचा बळी, अथणीतील घटना

sakal_logo
By
टीम ई सकाळ

अथणी : अथणी तालुक्यात कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. कृष्णाकाठावर असलेल्या गावे व रस्त्यांचा संपर्क तुटला आहे. नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. यातच तालुक्यातील सवदी येथील पाण्याच्या प्रवाहात सोमवारी (२६) वाहून गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला. रामगोंडा सिद्धगोंडा पाटील (वय 55) असे त्यांचे नाव आहे. शेतातून जनावरांसह स्थलांतरीत होताना पाण्याच्या प्रवाहात अडकून त्यांचा मृत्यू झाला. एनडीआरएफची तुकडीने मृतदेहाचा मंगळवारी (२७) शोध घेतला. मयताच्या मागे आई, वडील, पत्नी, मुले असा परिवार आहे.

कृष्णेच्या पुराचा अथणी तालुक्यातील वीस गावांना फटका बसला आहे. 2005, 2019, 2021 या तीन वर्ष तालुक्याला फटका बसला आहे. यंदा सर्वात जास्त महापूर आला आहे. आठ ठिकाणी गंजीकेंद्रे सुरु केली आहेत. पूरग्रस्तांना अनेक संघ, संस्थाकडून मदत दिली जात आहे. नंदेश्वर, दर्गा, महेशवाडगी, जनवाड, सत्ती, दोडवाड, नांगनूर-पीके, औरवाड, तंगडी, शिनाळ, तीर्थ, सप्तसागर या गावांना पुराचा वेढा पडला आहे. त्यामुळे भीती व्यक्त होत आहे.

हेही वाचा: जिन्नस नकोय, पाणी हवय, पाणी..; चिपळुणातील गृहिणी हताश

पूरग्रस्तांच्या बचावासाठी प्रयत्न

अथणी तालुक्यातील हजारो एकरातील पिके पाण्याखाली गेली आहेत. अनेक जनावरांचा मृत्यू झाला. पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी हरियाना येथून आलेले एनडीआरएफ पथक, अग्निशामक, पोलिस तळ ठोकून आहेत. काँग्रेस नेते गजानन मंगसुळी यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली.

loading image
go to top