esakal | तू रागाने का बघतोस? असे म्हणत हृषीकेशला दुचाकीवरून खाली पाडून कोयत्याने केले वार, सांगलीतील घटना
sakal

बोलून बातमी शोधा

crime case in sangli attack on youth from other he injured

काल सकाळी साडेदहाच्या सुमारास तो कामगार अमीन याला मजुरीचे पैसे देण्यासाठी गारपीर चौकात गेला.

तू रागाने का बघतोस? असे म्हणत हृषीकेशला दुचाकीवरून खाली पाडून कोयत्याने केले वार, सांगलीतील घटना

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली : शहरातील शंभरफुटी परिसरातील विठ्ठलनगर येथील हृषीकेश दुर्गादास कांबळे (वय 21) याच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. याप्रकरणी चौघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रोहित सातपुते, गणेश सातपुते, फऱ्या आणि जाफऱ्या (पूर्ण नाव माहीत नाही) अशी गुन्हा दाखल असलेल्याची नावे आहेत. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की हृषीकेश कांबळे हा मजुरी काम करतो. काल सकाळी साडेदहाच्या सुमारास तो कामगार अमीन याला मजुरीचे पैसे देण्यासाठी गारपीर चौकात गेला. त्यावेळी संशयित त्याला अडवले. 'तू आमच्याकडे रागाने का बघतोस', असा जाब विचारण्यास सुरवात केली. त्यानंतर हृषीकेश यास दुचाकीवरून खाली पाडण्यात आला. रोहित सातपुते याने कोयत्याने हल्ला केले. तर गणेश सातपुते याने दगडाने मारहाण करून जखमी केले. अन्य दोघांनी शिवीगाळ करून मारहाण केले. त्यानंतर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. त्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिस अधिक तपास करत आहेत. 

हेही वाचा - संभाजी भिडे यांच्यावर कारवाई होणार