चालक ट्रकमधून खाली उतरताच लुटारूंनी कोयत्याच्या उलट्या बाजूने केले वार ; महामार्गावर लुट

crime cases in belgaum robbery of five truck on highway driver injured by unknown people in belgaum
crime cases in belgaum robbery of five truck on highway driver injured by unknown people in belgaum
Updated on

कर्ले (बेळगाव) : बेळगाव-चोर्ला राज्य महामार्गावरील किणये घाटात लुटारू टोळीने दहशत माजविली आहे. गोव्याला साहित्य घेऊन जाणारी पाच मालवाहू वाहने चालक व वाहकांना शस्त्रांचा धाक दाखवून गुरुवारी मध्यरात्री लुटण्यात आली. यावेळी खाली उतरलेल्या एका वाहनचालकावर लुटारूंनी कोयत्याच्या उलट्या बाजूने पाठीत वार केला. यापूर्वी १२ डिसेंबर रोजीही एक ट्रक लुटण्यात आला होता.

गोव्याला रोज बेळगावातून विविध साहित्य घेऊन जाणारी वाहने ये-जा करत असतात. भाजीपाला, जीवनावश्‍यक वस्तूंसह इतर साहित्य घेऊन जाणाऱ्या वाहनांची संख्या अधिक आहे. मात्र, रात्रीच्या वेळी बेळगाव-चोर्ला मार्गावरील किणये घाटात वाहने लुटणारी सशस्त्र टोळी सक्रिय झाली आहे. गुरुवारी रात्री साडेबाराच्या सुमारास कलमठ रोडवरील लक्ष्मी विष्णू रोडलाइन्सच्या वाहनापाठोपाठ कांदा, बटाटे व इतर साहित्य घेऊन पाच वाहने गोव्याकडे चालली होती.

किणये घाटातील रिझेन्टा हॉटेलसमोर घालण्यात आलेल्या गतिरोधकाजवळ वाहनांची गती कमी होताच झाडीतून हातात 
कोयता व विळे घेऊन आलेल्या तिघांनी वाहनांच्या मागे चढून ताडपत्री व दोऱ्या तोडून साहित्याची लूट करण्यास सुरुवात केली.
टेम्पोतून साहित्य खाली पडल्याने चालक खाली उतरताच तोंडाला काळे फासलेल्या लुटारुंनी त्याच्या पाठीत कोयत्याच्या उलट्या बाजूने वार केला.

वाहनातील कांदे, बटाटे, नवीन सायकल व इतर साहित्य घेऊन लुटारुंनी पलायन केले. त्यानंतर काहींनी ही माहिती पोलिसांना कळविली. १२ डिसेंबरलाही अशाच पद्धतीने ट्रक लुटण्यात आला होता. तरीही ही बाब पोलिसांनी गांभीर्याने घेतलेली नाही. गतिरोधक संपल्यानंतर पुढे चढती आणि वळण आहे. त्यामुळे काहीवेळ या ठिकाणी वाहने अत्यंत सावकाश पुढे जातात. याचा फायदा घेत लुटारुंनी दहशत माजविली आहे; परंतु तक्रार दाखल झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

तक्रार द्यावी, मगच पाहू !

याबाबत पोलिस उपायुक्‍त चंद्रशेखर निलगार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, किणये घाटात घडलेल्या घटनेची आपल्याला कल्पना नाही. वाहने लुटण्यात येत असल्यास संबंधितांनी पोलिसांत फिर्याद दाखल करावी. त्यानंतर पुढे पाहू, अशी प्रतिक्रिया दिली.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com