esakal | प्रेयसीच्या आईवडिलांनीच काढला 'त्याचा' काटा; प्रेम प्रकरणातून तरुणाचा खून
sakal

बोलून बातमी शोधा

खून प्रकरणी श्री राम सेना हिंदुस्थानच्या खानापूर तालुका प्रमुखासह 10 जण गजाआड

खून प्रकरणी श्री राम सेना हिंदुस्थानच्या खानापूर तालुका प्रमुखासह 10 जण गजाआड

sakal_logo
By
अमृत वेताळ

बेळगाव : मूळ खानापूर सध्या (रा. अजमनगर) येथील अरबाज मुल्ला या तरुणाच्या खून प्रकरणाचा उलगडा झाला आहे. याप्रकरणी शुक्रवार (८) विशेष तपास पथकाने १० जणांना अटक केली आहे. ही घटना प्रेम प्रकरणातून घडली आहे. मुलीच्या आईवडिलांनीच अरबाजचा काटा काढण्यासाठी सुपारी दिली होती, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यानुसार पोलिसांनी खानापूर तालुका श्रीराम सेना हिंदुस्थानचे प्रमुख पुंडलिक उर्फ महाराज नागाप्पा मुतगेकर (वय ३९, रा. वत्तोळी ता. खानापूर) यांच्यासह १० जणांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा: पत्नीचे चारित्र्य अन् अपत्याच्या संशयावरून 'आरव'चा खून

कुतूबुद्दीन अल्लबक्ष बेपारी (वय ३६, रा. बाहेर गल्ली खानापूर), सुशीला इराप्पा कुंभार (वय ४२, रा. मारुतीनगर खानापूर), मारुती प्रल्हाद सुगते उर्फ गोंधळी (वय ३०, मरेम्मा कॉलनी खानापूर), मंजुनाथ तुकाराम गोंधळी (वय २५, रा. विद्यानगर खानापूर), गणपती ज्ञानेश्वर सुतगे उर्फ गोंधळी (वय २७, रा. विद्यानगर खानापूर), इराप्पा बसवनेप्पा कुंभार (वय ५४, मारुतीनगर खानापूर), प्रशांत कल्लाप्पा पाटील (वय २८, चन्नेवाडी ता. खानापूर), प्रवीण शंकर पुजेरी (वय राहणार बाळेकुंद्री खुर्द) आणि श्रीधर महादेव डोनी (वय ३१ रा. होनगा ता. बेळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

loading image
go to top