esakal | अत्यंत शांत डोक्याने 'आरव'चा खून; बापाने दिली लेकराच्या हत्येची कबूली
sakal

बोलून बातमी शोधा

पत्नीचे चारित्र्य अन् अपत्याच्या संशयावरून 'आरव'चा खून

राकेश मोबाईलवर आलेले संदेश आणि इतरांशी बोलण्यावरून पत्नीच्या चारित्र्यावर शंकेसह अपत्याबाबत संशय घेत होता.

पत्नीचे चारित्र्य अन् अपत्याच्या संशयावरून 'आरव'चा खून

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर/सरूड : पत्नीच्या चारित्र्य आणि अपत्याच्या संशयावरून अत्यंत शांत डोक्याने सहा वर्षाच्या 'आरव'चा खून केल्याची कबुली बापाने दिली. यानंतरच त्याला अटक केली. राकेश रंगराव केसरे (वय २७) असे त्या संशयित बापाचे नाव असल्याचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या प्रकरणाचा ४८ तासात छडा लावल्याबद्दल तपास पथकाला २५ हजारांचे बक्षीसही त्यांनी जाहीर केले.

चार दिवसांपूर्वी आरव बेपत्ता झाल्यानंतर तपासाची दिशाभूल करण्याचाही प्रयत्न संशयित बापाने केल्याचेही बलकवडे म्हणाले. दरम्यान, राकेशला ११ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. बलकवडे यांनी दिलेली माहिती अशी : वारणा कापशी (ता. शाहूवाडी) येथील बेपत्ता आरव एका महिलेसोबत दिसल्याची माहिती पुढे आली. पोलिसांनी नातलगांसह ११ संशयितांची कसून चौकशी केली. दरम्यान, श्वान पथक आणि फौरेन्सिक पथकाच्या माहिती आधारे पोलिसांनी आरवचा बाप राकेशला बुधवारी रात्री ताब्यात घेतले. बलकवडे, अपर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, शाहूवाडी पोलिस उपअधीक्षक रवींद्र साळोखे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव, सायबरचे शशिराज पाटोळे, शाहूवाडीचे विजय पाटील, सहायक निरीक्षक किरण भोसले, श्रद्धा आमले, प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक प्रसाद कोळपे, कर्मचारी हिंदूराव केसरे, नितीन चोथे, सचिन गुरखे, श्रीकांत मामलेकर, आत्माराम शिंदे, शिवाजी जामदार, राजेंद्र वरंडेकर यांनी केला.

हेही वाचा: कोल्हापूर - अंबाबाई मंदिरातील अपरिचित वैभव

छाताडावर मारला ठोसा

राकेश मोबाईलवर आलेले संदेश आणि इतरांशी बोलण्यावरून पत्नीच्या चारित्र्यावर शंकेसह अपत्याबाबत संशय घेत होता. यावरून दोघांमध्ये वाद होत होता. त्याचा तीन ऑक्टोबरला दुपारी पत्नीशी वाद झाला. त्याने आरवला दहा रुपये देऊन दुकानात पाठवले. दरम्यान, त्याची पत्नी रागाने मैत्रिणीकडे निघून गेली. आरव फुगा घेऊन घरी आला. चिडलेल्या राकेशने आरवच्या छातीवर ठोसा मारला. तो भिंतीवर आपटून निपचित खाली पडला. त्यानंतर त्याने त्याला घराजवळील पडक्या घरात नेले. तेथे त्याने त्याचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिल्याचे अधीक्षक बलकवडे यांनी सांगितले.

कडब्याखाली लपवला मृतदेह...

केसरेच्या घरामागे अडगळीची खोली आहे. त्यात एक चर आहे. राकेशने चरीत मृतदेह ठेवला. त्यावर कडब्याच्या पेंड्या टाकून तो घरी गेला. तेथून तो हॉटेल मालकासोबत कामाला निघून गेल्याचे बलकवडे यांनी सांगितले. आरवचे चुलते तीन ऑक्टोबरच्या सायंकाळी जनावरे घेऊन घरी आले. नेहमी घरात आल्या आल्या अंगाशी दंगामस्ती करणारा आरव कुठे दिसत नाही. याबाबत त्यांनी विचारणा केली.

हेही वाचा: Air Force Day: PM मोदींनी दिल्या सदिच्छा; वाचा IAFबद्दलच्या खास गोष्टी

फोन करून घेतला कानोसा...

कामावर गेलेल्या राकेशने घरी काय घडते आहे, याचा कानोसा घेण्यासाठी तीन ऑक्टोबरला पत्नीला तुझी तब्येत कशी आहे, याबाबत दोनदा फोन करून विचारणा केल्याची तपासात पुढे आल्याचे पोलिसांनी सांगितले.

नारळ, गुलाल कुंकवाची खरेदी

आरवचा शोध सुरू असतानाच राकेशने गावातील एका दुकानातून नारळ, लिंबू, गुलाल आणि कुंकू खरेदी केले. गावातील एका मंदिरात जावून नारळ आणि लिंबू ठेवला. त्यानंतर आरवला शोधण्याचाही बनाव केला.

दिशाभूल करण्याचा प्रयत्न...

राकेशचा पत्नी व सासूवर राग होता. शोधमोहिमेत तो सासू देवताळी असल्याचे इतरांना सांगत होता. त्याने आरवचा मृतदेह मंगळवारी (५) रात्री साडेदहाच्या सुमारास घराजवळ टाकला. त्यावर दुकानातून गुलाल, कुंकू टाकून हा नरबळीचा प्रकार असल्याचे भासवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात पुढे आल्याचे बलकवडे यांनी सांगितले.

मला मारायचा नाहीस का?

चुलत्यांचा आरववर खूप लळा होता. स्वतःच्या भावानेच खून केल्याचे उघड झाल्यानंतर त्यांनी ‘अरे मला मारायचे नाही का? बिचाऱ्याला का मारलंस? असा सवाल राकेशला करत आक्रोश केल्याचेही पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा: ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पेट्रोल-डिझेलचा भडका; पाचवेळा दरात वाढ

तपासाचे शिलेदार -

नात्याचा आधाराने उलगडले गूढ

आरवचा खून नेमका कोणी व काशासाठी केला याच्या मुळापर्यंत पोहचण्याचे कसब पोलिसांसमोर होते. संशयित राकेशला नात्याचा आधार घेत विश्वासात घेऊन बोलते करण्याचे काम स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस नाईक हिंदूराव केसरे यांनी केले. तपास कामात सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शशिराज पाटोळे आणि सहायक पोलिस निरीक्षक श्रद्धा आंबले यांनी महत्त्‍वाची भूमिका बजावली.

loading image
go to top