esakal | मृतदेहावर 2 दिवस उपचार करणार डॉक्टर अटकेत; इस्लामपुरातील प्रकार
sakal

बोलून बातमी शोधा

मृतदेहावर 2 दिवस उपचार करणार डॉक्टर अटकेत; इस्लामपुरातील प्रकार

मृतदेहावर 2 दिवस उपचार करणार डॉक्टर अटकेत; इस्लामपुरातील प्रकार

sakal_logo
By
टीम ई सकाळ

इस्लामपूर : रुग्णाच्या मृत्यूनंतरही दोन दिवस उपचार सुरू ठेवून बिल उकळणाऱ्या इस्लामपूर (islampur) येथील आधार हेल्थ केअरच्या डॉ. योगेश वाठारकर याच्या विरोधात इस्लामपूर पोलिस ठाण्यात (police station) गुन्हा दाखल झाला आहे. डॉ. वाठारकर याला इस्लामपूर पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली आहे. डॉ. वाठारकर याच्या या कृतीने ‘गब्बर इज बॅक’ (gabbar is back) या हिंदी सिनेमाचा अनुभव इस्लामपूर शहराच्या वैद्यकीय क्षेत्रात आला आहे. सांगली (sangli) येथील अपेक्स हॉस्पिटलच्या (appex hospital) कारवाईनंतर वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणारी ही घटना उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबतची फिर्याद सलीम हमीद शेख (वय ३५, रा. कासेगाव) यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात दिली आहे. ही घटना मार्च महिन्यातील आहे. २४ फेब्रुवारीला सलीम शेख यांच्या आई सायरा हमीद शेख यांना आधार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. त्यांच्यावर प्रथमदर्शनी ब्रेन पॅरालिसेस असल्याचे वाठारकर याने सांगितले होते. त्यानंतर किडनीचा त्रास सुरू झाला. नंतर त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांच्यावर व्हेंटिलेटरवर उपचार केले. या दरम्यान ८ मार्चला सकाळी ११ वाजून ४८ मिनिटांनी रुग्णाचा मृत्यू झाला, मात्र त्यानंतर पुढे दोन दिवस १० मार्चपर्यंत योगेश वाठारकर याने मृतदेहावर उपचार सुरू ठेवले. तशी बनावट कागदपत्रे बनवून हॉस्पिटलच्या जादा बिलाची आकारणी शेख यांच्याकडून करण्यात आली. आईच्या मृत्यूनंतर वडिलांच्या पेन्शनसाठी आईचा मृत्यू दाखला इस्लामपूर नगरपालिकेकडून घेण्यात आला. त्यावर शेख यांचा मृत्यू ८ मार्चला झाल्याची नोंद आहे, तर हॉस्पिटलची बिले १० मार्चपर्यंत आकारण्यात आली आहेत.

हेही वाचा: लालपरीचा प्रवास आता कमी खर्चात; एसटी धावणार वीज आणि गॅसवर

याची हॉस्पिटल प्रशासन व नगरपालिकेकडे चौकशी केली असता वाठारकर याने रुग्णाचा मृत्यू होऊनही दोन दिवस मृतदेहावर उपचार केल्याचे निष्पन्न झाले. याबाबतची तक्रार इस्लामपूर पोलिस ठाण्यात केल्यानंतर पोलिसांनी प्रकरण सांगली सिव्हिल हॉस्पिटलचे अधिष्ठाता यांच्याकडे पाठवून यावर अभिप्राय मागितला. त्यांनी डॉ. योगेश वाठारकर याने सायरा हमीद शेख यांच्याबाबत सादर केलेल्या कागदपत्रे व मृत्यूच्या तारखेमध्ये एकसूत्रता नसल्याचा अभिप्राय दिला आहे. ८ मार्चला सकाळी ११ वाजून ४८ मिनिटांनी मृत झाल्या असूनही त्यांच्या मृतदेहावर दोन दिवस पुढे उपचार करुन जादा बिल आकारल्याचे दिसून आले. आज त्या अहवालानुसार इस्लामपूर पोलिसांनी डॉ. योगेश वाठारकर याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पोलिस निरीक्षक नारायण देशमुख तपास करीत आहेत.

loading image