esakal | लालपरीचा प्रवास आता कमी खर्चात; एसटी धावणार वीज आणि गॅसवर
sakal

बोलून बातमी शोधा

लालपरीचा प्रवास आता कमी खर्चात; एसटी धावणार वीज आणि गॅसवर

लालपरीचा प्रवास आता कमी खर्चात; एसटी धावणार वीज आणि गॅसवर

sakal_logo
By
शिवाजी यादव

कोल्हापूर : सव्वा वर्षात एसटी महामंडळाची (ST mahamandal) प्रवासी सेवा जेमतेम सुरू आहे. परिणामी दिवसाकाठी १२ कोटींच्या महसुलावर पाणी सोडावे लागत आहे. भविष्यात प्रवाशांना कमी खर्चात सक्षम सेवा देण्यासाठी महामंडळ विविध उपाययोजना राबवत आहे. त्याचाच भाग म्हणून राज्यातील (maharashtra) तीन हजार एसटी बस डिझेल ऐवजी गॅसवर धावण्यासाठी तांत्रिक बदल केले जात आहेत. यातून इंधन खर्चाची बचत होऊन कमी खर्चात सक्षम प्रवासी सेवा देता येणे एसटीला शक्य होणार आहे.

महामंडळाच्या ताफ्यात जवळपास १८ हजार बस आहेत. प्रत्येक जिल्ह्यात कमीत कमी २०० ते ६०० बसचा ताफा आहे. यातून दररोज ३६ लाख प्रवाशांची वाहतूक होते. कोरोनामुळे (covid-19) फक्त अत्यावश्यक सेवेतील नागरिकांसाठी प्रवासी सेवा सुरू होती. त्यातून २५ टक्के महसूल जमा होत होता. दहा दिवसांत काही जिल्ह्यांत प्रवासी सेवा पुन्हा सुरू झाली. प्रवासी प्रतिसाद मात्र जेमतेम आहे. वर्षभरात आठशे कोटींच्या महसुलावर महामंडळाला पाणी सोडावे लागले. वर्षभरात एसटीला अभूतपूर्व तोटा झाला आहे. तरीही भविष्यात काटकसरीचे धोरण स्वीकारून प्रवाशांना जास्तीत जास्त चांगली सेवा देता येणार आहे.

हेही वाचा: दिलासादायक; कोल्हापुरात कोरोनाची साथ येतेय नियंत्रणात

एसटीला इंधन खर्च व प्रवासी कराचा मोठा खर्च आहे. यावर पर्याय म्हणून एसटी तीन हजार बस एलएनजीवर (लिक्विफाईड नॅचरल गॅस) चालविण्यात येतील. त्यासाठी एसटीच्या सध्या वापरात असलेल्या बसमध्ये तांत्रिक बदल करण्यात येत आहेत. त्याची चाचणी म्हणून एका बसमध्ये तांत्रिक बदल केला आहे. यापुढे यशस्विता पाहून टप्प्याटप्प्याने अन्य बसही एलएनजीवर करण्यात येतील, अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.

शंभर एसटी बस विजेवर

याशिवाय प्रायोगिक तत्त्वावर शंभर बस विजेवर चालविण्यात येणार आहेत. त्यासाठीही तांत्रिक बदल केले जात आहेत. दोन महिन्यात प्रयोग यशस्वी होईल. त्यातील सर्वाधिक बस पुणे मार्गावर धावणार आहेत. त्यासाठी ठिकठिकाणी चार्जिंग पॉईंटही करण्यात येत आहेत. हे कामही पूर्णत्वास येत असून लवकरच निविदा निघण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: Panderi Dam Update: दोन दिवसाच्या अथक प्रयत्नाला अखेर यश

इंधन खर्चात बचत

गॅस व विजेच्या दोन्ही प्रयोगांमुळे एसटीच्या इंधन खर्चात बचत होणार आहे. सध्या एसटीला ८८ रुपयांना एक लिटर या किमतीने डिझेल घ्यावे लागते. त्याऐवजी जेमतेम ३० रुपये खर्चात गॅस किंवा विजेवर एसटी धावू शकणार आहे.

loading image