esakal | पोटच्या लेकराकडून घात; डोक्यात पार घालून वडिलांचा केला खून I Crime
sakal

बोलून बातमी शोधा

crime cases in belgaum son attack father and he died reason estate

हल्लेखोर मुलाने खुनासाठी वापरलेली पार जप्त केली. संशयित विजयला कोणतेही व्यसन नाही.

पोटच्या लेकराकडून घात; डोक्यात पार घालून वडिलांचा केला खून

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मिरज : येथील कुपवाड रस्त्यावर होमगार्ड प्रशिक्षक केंद्रानजीक राहणाऱ्या किसन जोतिराम माने (वय ५०) यांचा त्यांच्या मुलानेच खून केला. महात्मा गांधी चौक ठाण्यात नोंद झाली आहे. हल्ल्याचे नेमके कारण समजू शकले नाही.

हेही वाचा: जुने वाहन खरेदी करताय? फक्त 'NOC' नको, मूळ टॅक्‍स पावती घ्या, अन्यथा...

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की दुपारी घरी वडील एकटे असताना मुलगा विजय किसन माने याने डोक्यात पार घालून खून केला. विजयला रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आले. किसन याची पत्नी शेळ्या चरवण्यास गेली होत्या. त्या परतल्यानंतर त्यांना दरवाज्यासमोर पतीचा मृतदेह दिसला. त्यांनी हंबरडा फोडला. हल्ल्यानंतर विजय पळून गेला होता. त्याला पळून जाताना आईने पाहिले होते. त्यामुळेच खून मुलगा विजयने केल्याचे स्पष्ट झाले. खुनाची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवली.

महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस काही क्षणात घटनास्थळी आले. तोवर हल्लेखोर विजय माने पसार झाला होता. त्याला रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आले. पोलिस उपअधीक्षक अशोक वीरकर यांनी घटनास्थळी भेट दिली. हल्लेखोर मुलाने खुनासाठी वापरलेली पार जप्त केली. संशयित विजयला कोणतेही व्यसन नाही. तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने दोन वर्षांपूर्वी त्याची पत्नी मुलांसोबत माहेरी गेली आहे. घरात विजय, त्याचे आई-वडील असे तिघेच राहत.

हेही वाचा: सेन्सेक्सची मुसंडी! पहिल्यांदाच पार केला 61 हजारांचा टप्पा

loading image
go to top