esakal | हॉटेल व्यवसायिकाची रेल्वेखाली आत्महत्या; सांगलीतील घटना
sakal

बोलून बातमी शोधा

हॉटेल व्यावसायिक गंभीर जखमी

हॉटेलचे नूतनीकरण केल्यावर दुसऱ्याच वर्षी २०१९ मध्ये आलेल्या महापुराचा मोठा फटका बसला.

हॉटेल व्यवसायिकाची रेल्वेखाली आत्महत्या; सांगलीतील घटना

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली : येथील कोल्हापूर रस्त्यावरील हॉटेल शुभम गार्डनचे मालक सचिन सर्जेराव पवार (वय ४८, रा. पवार मळा, कोल्हापूर रस्ता) यांनी तणावातून रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला. कोरोना, महापुराचा व्यवसायाला फटका आणि कर्जाचा डोंगर वाढल्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. मिरज रेल्वे पोलिसांत याबाबत नोंद झाली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सचिन पवार यांचा हॉटेल व्यवसाय आहे. कोल्हापूर रस्त्यावर पवार मळा परिसरात त्यांचे हॉटेल शुभम गार्डन आहे. २०१० पासून पवार हे हॉटेल व्यवसायात आहेत. या व्यवसायात त्यांनी बऱ्यापैकी जम बसवला होता. २०१८ मध्ये त्यांनी व्यवसायाची गरज लक्षात घेऊन नूतनीकरण केले. त्यासाठी त्यांनी बँकेतून कर्ज घेतले होते. हॉटेलचे नूतनीकरण केल्यावर दुसऱ्याच वर्षी २०१९ मध्ये आलेल्या महापुराचा मोठा फटका बसला. हॉटेल परिसरात पाच फुटांहून अधिक पाणी होते.

हेही वाचा: खुशखबर! यंदा रब्बीचा हंगाम येणार जोमात

महापुरात प्रचंड नुकसान झाल्यावर हॉटेल सुरू केले. महापुरातून सावरत असतानाच मार्च २०२० मध्ये कोरोनामुळे हॉटेल व्यवसाय बंद ठेवावा लागला. बरेच दिवस हॉटेल बंद होते; तर दुसरीकडे कर्जाचा डोंगर वाढत चालला होता. लॉकडाउनमध्ये शिथिलता आल्यावर हॉटेल सुरू केले. तोपर्यंत पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली. तसेच, अडीच महिन्यांपूर्वी आलेल्या महापुराचा पुन्हा फटका बसला. वारंवार व्यवसायात फटका बसल्याने पवार चांगलेच खचले. तशातच बँकेची वसुलीसाठी कारवाई सुरू होती. त्यामुळे ते तणावात होते.

या तणावातूनच पवार यांनी अंकली येथील रेल्वे पुलाजवळ धावत्या रेल्वेखाली उडी घेतली. त्यामुळे ते जखमी झाले. अपघातानंतर त्यांना तत्काळ शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी आणले; परंतु तोपर्यंत ते मृत झाले. अपघाताची मिरज रेल्वे पोलिसांत नोंद झाली आहे. दरम्यान, पवार यांच्या आत्महत्येमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या मागे वडील, भाऊ, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

हेही वाचा: तीन महिन्याच्या कुत्र्याचे कान कापणाऱ्या डॉ. कोल्हेवर गुन्हा

loading image
go to top