esakal | निपाणी : विवाहितेचा नदीत पडून मृत्यू, भाट नांगनूरातील घटना
sakal

बोलून बातमी शोधा

crime cases in nipani belgaum one lady draw river and dead

भुदरगड तालुक्यातील खानापूरतील प्राजक्ता हिचा विवाह भाट नांगनूर येथील उत्तम शिंदे यांच्याशी २००६ साली झाला होता.

निपाणी : विवाहितेचा नदीत पडून मृत्यू, भाट नांगनूरातील घटना

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

निपाणी (बेळगाव) : विवाहितेचा नदीत पडून मृत्यू झाल्याची घटना भाट नांगनूर (ता. निपाणी) येथे बुधवारी (७) घडली. प्राजक्ता उत्तम शिंदे (वय ३५) असे मृत महिलेचे नाव आहे. याबाबत पोलिस आणि त्यांच्या नातेवाईकांकडून समजलेली अधिक माहिती अशी, भुदरगड तालुक्यातील खानापूरतील प्राजक्ता हिचा विवाह भाट नांगनूर येथील उत्तम शिंदे यांच्याशी २००६ साली झाला होता. त्यांना १४ वर्षाची मुलगी असून ती गारगोटी येथील वसतिगृहात शिक्षण घेत आहे. 

उत्तम शिंदे हे वर्षापूर्वी भारतीय लष्करातून निवृत्त होऊन गावाकडे आले आहेत. ते आई, वडील, पत्नीसमवेत भाट नांगनूर येथे वास्तव्यास आहेत. बुधवारी (७) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास प्राजक्ता ही घराबाहेर पडली. मात्र बराच वेळ झाला तरी ती घराकडे परतली नाही. दरम्यान प्राजक्ता नदीत पडल्याची माहिती शिंदे कुटुंबीयांना मिळाली. त्यानुसार त्यांनी निपाणी ग्रामीण पोलिसांना घटनेची माहिती दिली.

हेही वाचा - Video - कोरोना नाहीच; त्यामुळे मरणारे जगण्याच्या लायक नाहीत; संभाजी भिडेंचे वादग्रस्त वक्तव्य
 

घटनास्थळी ग्रामीण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक बी. एस. तळवार, सहाय्यक उपनिरीक्षक के. एस. कंबार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मयत प्राजक्ताचे वडील नारायण जाधव यांनी रात्री उशिरा प्राजक्ताला फिट येण्याचा त्रास होता असे सांगितले. शिवाय ती मनोरुग्ण असल्याची फिर्याद दिली असून पुढील तपास उपनिरीक्षक तळवार करत आहेत. 

loading image