अश्‍लील इमोजीमुळे अडकला फेसबुक फ्रेंड!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 जानेवारी 2020

पोस्टवर अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र धनराज शिंदे या फेसबुक फ्रेंडने कॉमेंटमध्ये अश्‍लील इमोजी टाकून शुभेच्छा दिल्याचे दिसून आले.

सोलापूर : सामाजिक कार्यकर्त्या असलेल्या महिलेची संघटनेवर निवड झाल्यानंतर अभिनंदनाची पोस्ट फेसबुकवर पोस्ट टाकली होती. एकाने उत्साही फेसबुक फ्रेंडने त्या महिलेला शुभेच्छा देताना अश्‍लील इमोजींचा वापर केला. या प्रकरणात धनराज भानुदास शिंदे (वय 56, रा. पतंजली मॉलच्या मागे, जुळे सोलापूर) याच्यावर विनयभंगाचा गुन्हा विजापूर नाका पोलिसात दाखल करण्यात आला आहे. 

हेही वाचा : माहिती आहे का? 'मिडल ईस्ट'ला जाताहेत सोलापूरचे मासे!

कॉमेंटमध्ये अश्‍लील इमोजी
विजापूर नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका सामाजिक कार्यकर्त्या महिलेने आपल्या फेसबुक अकाउंटवर संघटनेवर पदाधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टवर अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र धनराज शिंदे या फेसबुक फ्रेंडने कॉमेंटमध्ये अश्‍लील इमोजी टाकून शुभेच्छा दिल्याचे दिसून आले. याप्रकरणात त्या महिलेच्या फिर्यादीनंतर आरोपी धनराज शिंदे याच्याविरुद्ध विजापूर नाका पोलिस ठाण्यात विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : रेल्वे रुळाजवळ सापडला स्वंयसेवकाचा मृतदेह

ऑनलाइन फसवणुकीप्रकरणी बाप-लेकीस पोलिस कोठडी 
क्राउंडफिंच सायबर नेटिक्‍स प्रायव्हेट लिमिटेड, जयपूर या कंपनीचे मालक मनीषकुमार नरेंद्रपाल कक्‍कर व नरेंद्रपाल पृथ्वीराज कक्‍कर यांनी विश्‍वासात घेऊन स्वराज्य पे डॉट कॉम या नावाने डोमेन देऊन सोलापुरातील सुनील शिवाजी पवार (रा. हनुमाननगर, भवानी पेठ) यांची सात लाख 99 हजारांची फसवणूक केली. या प्रकरणी आरोपींना न्यायदंडाधिकारी एम. एम. बावरे यांनी 13 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crime news about Use of pornographic emoji