मुलगी झाल्याने केला अर्भकाचा गळा आवळून खून; मातेस जन्मठेप

मुलगी झाल्याच्या नाराजीतून केले होते कृत्य
crime news sangli girl birth mother killed daughter Life imprisonment mother
crime news sangli girl birth mother killed daughter Life imprisonment mothersakal
Updated on

सांगली : मुलगी झाल्याने नाराज होऊन अवघ्या तिसऱ्या दिवशी त्या अर्भकाचा दुपट्ट्याने गळा आवळून खून केल्याप्रकरणी सुमित्रा गंगाप्पा जुट्टी (वय ३०, करगुट्टी, यल्लापूर, ता. हुक्केरी, जि. बेळगाव) या जन्मदात्या आईस जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. एल. मन्वर यांनी हा निकाल दिला. जिल्हा सरकारी वकील ए. आर. देशमुख यांनी काम पाहिले. खटल्याची हकिकत अशी, आरोपी सुमित्रा जुट्टी हिच्या पहिल्याच मुलाचा तीन दिवसांच्या आत मृत्यू झाला होता. ती कर्नाटकातून महाराष्ट्रात येऊन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बाळंतपणासाठी दाखल झाली होती. तिला मुलगी झाल्याचे समजल्यापासून ती नाराज होती.

मुलगी झाली म्हणून तिने यातूनच १८ ऑक्टोबर २०२० रोजी रात्री ८.३५ च्या सुमारास अर्भकाचा गळा आवळून खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. डॉ. मधुकर जाधव यांनी याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. सहायक पोलिस निरीक्षक अमितकुमार पाटील यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.या खटल्यात सरकार पक्षातर्फे दहा साक्षीदार तपासण्यात आले होते. त्यामध्ये रोशनी कौशल शिंदे ही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होती. तिने आरोपी ही अर्भकाचा गळा आवळत असताना पाहिले होते. ही बाब तिने तेथील परिचारिका रुपाली बजंत्री व अन्य परिचारिकांना सांगितली होती. त्यांनी लगेच अर्भकास लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात दाखल केले होते. डॉ. खोत यांनी उपचार करण्याचा प्रयत्न केला, मात्र उपचारांदरम्यान अर्भकाचा मृत्यू झाला होता.

प्रत्यक्षदर्शी साक्षीदार रोशनीसह डॉ. मधुकर जाधव, रुपाली बजंत्री, शारदा जुट्टी, शब्बीर हुजरे, डॉ. खोत, अश्विनी चौगुले, श्रद्धा आंबळे व सहायक निरीक्षक पाटील यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. त्यानुसार सुमित्रा जट्टी हिला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मातेने स्त्रीअर्भकाचा खून केल्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र खळबळ उडाली होती. अखेर या खटल्यात मातेला जन्मठेपेची शिक्षा झाली. जिल्हा न्यायालयातील महिला पोलिस वंदना मिसाळ, शरद राडे, गणेश वाघ, सुप्रिया भोसले, इम्रान महालकरी यांचे न्यायालयीन कामकाजात सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com