आमदार लंके समर्थक-तहसीलदार देवरे यांच्यातील बेबनाव पोलिसांत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 एप्रिल 2020

आमदार लंके समर्थक आणि तहसीलदार देवरे यांच्यातील बेबनाव थेट पोलिस ठाण्यात गेल्याचे चर्चेला ऊत आला आहे. या घटने बेवारस तांदूळ प्रकरणाची पार्श्वभूमी आहे.
 

पारनेर  : जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचा जमावबंदीचा आदेशाचा भंग व शासकीय कर्मचार्‍यांना धमकाविल्याप्रकरणी वनकुटे गावचे सरपंच अॅड.राहुल झावरे यांच्यासह आमदार नीलेश लंके यांच्या चार समर्थकांविरूद्ध तहसीलदार ज्योती देवरे यांनी फिर्याद दाखल केली आहे.
यासबंधीची माहिती अशी की  या घटनेतील संदीप चौधरी, जितेंद्र सरडे, बाळू चौरे, दादा दिनकर शिंदे, राहूल बबनराव झावरे सर्व (रा.पारनेर )  तीन  एप्रिल रोजी वनकुटे जंगलात बेवारस व खराब अवस्थेत तांदुळ व इतर शालेय पोषण आहाराची नासधूस झाल्याची कुठलीही माहिती न घेता फोटो व्हॉट्सअप ग्रुप वर प्रसारित करून नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण केले.

याबाबतची पाहणी करणेकरिता यातील फिर्यादी हे घटनास्थळी गेले असता तेथे आरोपी यांनी फिर्यादीस पंच व शासकीय कर्मचारी यांना अरेरावीची भाषा करून तुमची आत्ताच बदली करतो, अशी धमकी दिली.

आरोपी हे विनाकारण सार्वजनिक ठिकाणी फिरून जिल्हाधिकारी  यांनी जिल्ह्यामध्ये कोरोना साथीचे प्रसार होऊ नये याकरिता लागू केलेल्या आदेशाचे उल्लंघन करून विनाकारण फिरताना  सापडले.  अशा आशयाची तहसीलदार ज्योती देवरे यांनी त्यांच्या विरोधात पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
या बाबतचा पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अण्णा चव्हाण व हवालदार संतोष शेळके  करत आहेत.

तहसीलदार देवर यांनी घरी येऊन अरेरावीची भाषा केली. त्यामुळे माझ्या घरातील लोकांच्या स्वास्थ्यावर परिणाम झाला आहे, अशा आशयाची तक्रार आमदार लंके समर्थकांच्या कुटुंबातील महिलेने पोलिसांकडे तक्रार अर्ज केला होता.

आमदार लंके समर्थक आणि तहसीलदार देवरे यांच्यातील बेबनाव थेट पोलिस ठाण्यात गेल्याचे चर्चेला ऊत आला आहे. या घटने बेवारस तांदूळ प्रकरणाची पार्श्वभूमी आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crime in Parner against MLA Nilesh Lanke supporters