बेळगाव : गांजा विक्री करणाऱ्या दोघा तरुणांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime update Two youths arrested for selling cannabis Belgaum
बेळगाव : गांजा विक्री करणाऱ्या दोघा तरुणांना अटक

बेळगाव : गांजा विक्री करणाऱ्या दोघा तरुणांना अटक

बेळगाव : महाराष्ट्र राज्यातील पंढरपूरसह विविध भागातून गांजा आणून त्याची बेळगावात विक्री करणाऱ्या मिरज येथील दोघा तरुणांना शहर गुन्हे पोलिसांनी (सीसीबी) अटक केली आहे. रविवार (ता. १०) ही कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून २ लाख ४९ हजार रुपये किमतीचा ८ किलो ३०० ग्रॅम वजनाचा गांजा आणि १५ हजार रुपये किमतीची मोटरसायकल आणि एक मोबाइल जप्त केला आहे.

अमन अक्रम जमादार (वय २०, रा. ख्वाजा बस्ती मिरज जि. सांगली रा. महाराष्ट्र आणि फारुख आलमन खान (वय ३७ रा. ख्वाजा बस्ती मिरज जिल. सांगली रा. महाराष्ट्र सध्या रा. जुनेदीनगर कुडची ता. रायबाग अशी अटक करण्यात आलेल्या दोघा संशयीतांची नावे आहेत. वरील दोघे जण गेल्या काही वर्षापासून बेळगावात गांजाची तस्करी करत आहेत, अशी खात्रीलायक माहिती पोलिस निरीक्षक निंगनगौडा पाटील यांना मिळाली होती. तसेच ते गांजा विक्री करण्यासाठी होनगा येथे येणार आहेत. अशी माहिती मिळताच पोलिस निरीक्षक निंगनगौडा पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा रचून वरील दोघांना ताब्यात घेतले.

पोलीस ठाण्यात नेऊन त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी महाराष्ट्र राज्यातील पंढरपूर आणि विविध भागातील गांजा बेळगावात विक्री करत असल्याचे चौकशीदरम्यान सांगितले. त्यानुसार त्यांच्याकडून २ लाख ४९ हजार रुपये किमतीचा ८ किलो ३०० ग्रॅम वजनाचा गांजा १५ हजार रुपयांची मोटरसायकल आणि एक मोबाईल जप्त करण्यात आला. कारवाईमध्ये एच. एस. निसुण्णवर, बी.एस. बळगन्नवर, एस. एस. पाटील, एम. एम. वडेयर, एस. एम. बंजंत्री, वाय. डी. नदाफ, एस. बी. पाटील आदींनी सहभाग घेतला. सीसीबी पोलिसांनी केलेल्या कारवाईचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे. या प्रकरणी सीईएन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Crime Update Two Youths Arrested For Selling Cannabis Belgaum

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top