गुंड शकील गोलंदाज तीन जिल्ह्यातून तडीपार

धर्मवीर पाटील 
Wednesday, 9 September 2020

इस्लामपूर (सांगली)- येथील कुख्यात गुंड शकील गोलंदाजवर सांगली, सातारा व कोल्हापूर या तीन जिल्ह्यातून तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी, पोलीस उपअधीक्षक यांच्या आदेशाने इस्लामपूर पोलिसांनी ही कारवाई केली.

इस्लामपूर (सांगली)- येथील कुख्यात गुंड शकील गोलंदाजवर सांगली, सातारा व कोल्हापूर या तीन जिल्ह्यातून तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी, पोलीस उपअधीक्षक यांच्या आदेशाने इस्लामपूर पोलिसांनी ही कारवाई केली.

इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार शकील हारुण गोलंदाज (रा. लालचौक, इस्लामपूर) याचा प्रस्ताव तयार केला होता. शकीलवर इस्लामपूर पोलीस ठोण्यात गंभीर स्वरुपाचे एकुण 10 गुन्हे दाखल आहेत. तो शहर व परीसरामध्ये कुप्रसिध्द गुंड म्हणुन चर्चेत आहे. लोकांना विनाकारण त्रास देणे, दहशत निर्माण करणे, खुन करणे, जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर जमाव करुन दंगा करणे अशी कृत्ये त्याच्याकडून सुरू होती. त्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 56(1),अ,ब प्रमाणे नारायण देशमुख यांनी पोलीस अधिक्षक सांगली यांचेकडे प्रस्ताव पाठवला होता. तिकडून तो चौकशीसाठी कृष्णात पिंगळे यांच्याकडे आला. त्यांनी त्याची सखोल चौकशी करुन तो प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी नागेश पाटील यांना सादर केला. या प्रस्तावाची सुनावणी होवुन शकील हारुण गोलंदाज याला सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांच्या हद्दीतुन 2 वर्षांकरीता हद्दपार करणेत आले आहे.

हददपारीच्या काळात शकीलला रत्नागिरी जिल्हयात सोडणेत आले आहे. तो सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्हयात दिसुन आल्यास इस्लामपूर पोलीस ठाण्यास कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ, पोलीस हवालदार दिपक ठोंबरे, शरद जाधव, अरुण पाटील, अमोल चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल गणेश शेळके, प्रशांत देसाई यांनी ही कारवाई केली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: criminal Shakeel Golandaj deported from three districts