वसंतदादांच्या वारसांना शरद पवारांचा सूचक टोला 

0Sharad_Pawar_1_9
0Sharad_Pawar_1_9

सांगली ः "आम्ही नाही तर मग कुणीच नाही, हा राजकारणातील ट्रेंड अतिशय घातक आहे. सांगली विधानसभा मतदार संघात कॉंग्रेसच्या पृथ्वीराज पाटील यांचा पराभव झाला. त्यावेळी हेच घडले. ते कुणामुळे झाले यावर मी भाष्य करणार नाही. कॉंग्रेस, राष्ट्रवादी एकदिलाने लढली का? कार्यकर्त्यांनी ते समजून घ्यावे'', अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज वसंतदादा पाटील यांच्या वारसांना अप्रत्यक्ष टोला लगावला. 

मिरज येथे गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या रौप्य महोत्सव सांगता समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून श्री. पवार बोलत होते. गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव पृथ्वीराज पाटील यांनी यावेळी सांगली विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली. ते उणेपुणे आठ हजार मतांनी पराभूत झाले होते.

त्याबाबत मंत्री जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात धागा खोलला. जयंतराव म्हणाले, ""पृथ्वीराज पाटील आणि विरोधी उमेदवारात फार मोठे अंतर असेल, असे आम्हाला वाटले होते. पृथ्वीराज जिंकतील, अशी अपेक्षाच नव्हती. पण, केवळ आठ हजार मतांनी पराभव झाला आणि आमच्या लक्षात आले की थोडी ताकद लावली असती, कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे सारे लोक एकत्र, मनापासून काम केले असते तर कदाचित चित्र वेगळे असते.'' 

हाच धागा पकडून शरद पवार यांनी टोले लगावले. ते म्हणाले, ""राज्यात अनेक ठिकाणी असे घडले आहे. दोन्ही कॉंग्रेसच्या लोकांनी मनापासन काम केले असते तर अनेक ठिकाणी पराभव टाळता आला असता. सांगलीतही तेच झाले. काही लोकांना वाटतं, की आम्ही नाही तर दुसरं कुणी नाही. राजकारणात हा ट्रेंड आलाय. सांगलीत हे कुणामुळे झाले हे भाष्य करणार नाही. पण, राजकारणात असे चालत नाही. कार्यकर्त्यांनी समजून घ्यावे. त्यात सुधारणा करावी. अन्यथा, अशाने पक्ष अडचणीत येतील.'' 

दरम्यान, पवार यांचा रोख सरळ वसंतदादा पाटील यांच्या वारसांवर होता, याची चर्चा रंगली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सांगलीची जागा वसंतदादा पाटील यांच्या वारसांनी कॉंग्रेसकडून लढली आहे. त्यात सातत्याने कॉंग्रेसला अपयशच आहे. यावेळी दादा घराण्याबाहेरचा उमेदवार कॉंग्रेसने रिंगणात उतरवला होता. पृथ्वीराज पाटील यांनी जोरदार लढत देत एकतर्फी वाटणाऱ्या निवडणुकीत भाजपला घाम फोडला होता.  

स्व. डॉ. पतंगराव कदम खुले सभागृह नामकरण सोहळा, स्व. संयोगिता पाटील केंब्रीज स्कूल नामकरण सोहळा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाला. यावेळी "स्व. गुलाबराव पाटील पुरस्कार' सिम्बायोसिस विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार, प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉ. एस. व्ही. सोरटूर यांना प्रदान करण्यात आला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार श्रीनिवास पाटील, सहकार व कृषी राज्यमंत्री विश्‍वजित कदम, गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, आमदार मोहनराव कदम, आमदार विक्रम सावंत, आमदार सुमन पाटील, आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकचे कुलगुरू डॉ. दीपक म्हैसेकर, गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com